‘स्पोर्टस बुक’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

By Admin | Updated: July 6, 2014 00:16 IST2014-07-05T23:59:35+5:302014-07-06T00:16:26+5:30

हिंगोली : ‘लोकमत’द्वारा आयोजित ‘स्पोर्टस बुक’ ही धमाल स्पर्धा ९ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आली.

'Sports Book' prize distribution prize | ‘स्पोर्टस बुक’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

‘स्पोर्टस बुक’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

हिंगोली : ‘लोकमत’द्वारा आयोजित ‘स्पोर्टस बुक’ ही धमाल स्पर्धा ९ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शहरातील भारतीय विद्यामंदिर शाळेत ५ जुलै रोजी सकाळी पंचायत समितीचे सभापती छगन बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील भारतीय विद्यामंदिर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. स्पर्धेमधील प्रथम बक्षिसाचा विजेता हनुमान कल्याणकर (वर्ग ८ वा), द्वितीय- अथर्व वाकोडकर (वर्ग ५ वा), तृतीय- पुनम सोनोने (वर्ग ५ वा) आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी सहशिक्षक एस.पी. जाधव, एस.के. जोंधळे, एम.पी. पुरी, सी.आर. वाबळे, एस.आर.वाबळे, एस.आर. गुठ्ठे, व्ही.एस. घुगे, सहशिक्षिका एस.एस. जाधव, आर. के. भवर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना सभापती बनसोडे यांनी ‘लोकमत’कडून शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमांतर्गत ग्रीन किडस् सदराखालील प्रसिद्ध होत असलेली ‘पर्यावरण व ऊर्जा’ विषयीची विविध माहिती विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारी आहे. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सभापतींकडून कौतुक
‘लोकमत’कडून शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे पं.स.सभापती छगन बनसोडे यांनी बक्षीस वितरणप्रसंगी विशेष कौतुक केले.
नुकत्याच सुरू झालेल्या ग्रीन किड्स सदराखालील ‘पर्यावरण व उर्जा’ ची माहिती विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर घालणारी असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Web Title: 'Sports Book' prize distribution prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.