सासू-सून संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: July 17, 2014 01:34 IST2014-07-17T01:13:55+5:302014-07-17T01:34:58+5:30
लातूर : लोकमत सखी मंच सदस्यांसाठी आयोेजित करण्यात आलेल्या सासू-सून संमेलनास सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दयानंद सभागृहात घेण्यात आलेल्या स्पर्धेस प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली़

सासू-सून संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : लोकमत सखी मंच सदस्यांसाठी आयोेजित करण्यात आलेल्या सासू-सून संमेलनास सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दयानंद सभागृहात घेण्यात आलेल्या स्पर्धेस प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली़
प्रारंभी दैवशाला पाटील, दुर्गा पाटील, कमल ब्रिजवासी, कविता ब्रिजवासी, रंजना गित्ते, डॉ़ दीपा गित्ते, सुलेखा कारेपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ परिक्षक म्हणून रागिनी यादव, लता प्रयाग यांनी काम पाहिले़ पाहुण्यांचे स्वागत लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता थोरे, शाखा उपव्यवस्थापक नितीन खोत यांनी केले़
यावेळी आशुतोष ताकपिरे याने गणेशवंदना सादर केली़ चार फेरीत झालेल्या स्पर्धेत इंट्रोडक्शन, मॅचिंग, सादरीकरण, प्रश्नउत्तर फेरीचा समावेश होता़ तितिक्षा राजेमाने हिच्या बोला दाजीबा माझ्याशी प्रेमाने या बहारदार लावणीवर सखी मंच सदस्यांनी ठेका धरला़ त्याचप्रमाणे या कार्यक्रमात दयानंद स्टार या आर्केस्ट्रातर्फे सुरेल गाण्यांची मैफिल सजली़ ‘ही पोली साजूक तुपातली’ या गाण्यावर सखींनी नृत्य सादर केले़
या स्पर्धेत सासू-सुनांच्या पहिल्या तीन जोड्या काढण्यात आल्या़ यामध्ये प्रथम क्रमांक उषा भोसले व मधुरा भोसले यांनी मिळविला़ द्वितीय क्रमांक लीला जेवरीकर व सुचिता जेवरीकर यांनी तर तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला़ त्यात राजश्री पाटील व प्रतिभा पाटील, श्रीदेवी बिरादार व ज्योती बिरादार यांचा समावेश आहे़ कार्यक्रमास प्रायोजकत्व द्वारकादास श्यामकुमार, मनोजा एजन्सी, राजभोग आटा, स्रेहा ब्युटीपार्लर यांनी दिले़
सूत्रसंचालन प्रतीक्षा राजेमाने यांनी केले़ ओंकार धर्माधिकारी यांनी आभार मानले़