‘धमाल डान्स शो’ला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 21, 2014 23:18 IST2014-08-21T23:10:16+5:302014-08-21T23:18:34+5:30
परभणी : लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या धमाल डान्स शो आणि दहीहंडी कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

‘धमाल डान्स शो’ला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी : लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या धमाल डान्स शो आणि दहीहंडी कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
येथील हरीप्रसाद भवनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य प्रायोजक साई बेंटेक्स ज्वेलरीचे बालासाहेब घिके, गौरव सहस्त्रबुद्धे, प्रशांत पाटील, महेंद्र मोताफळे, लता वाजपेयी, ओम फर्निचरच्या अनिता जांगीड, निताताई देशमुख, सविता अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले़
सूत्रसंचालन श्याम जवळेकर यांनी केले़ ग्रुव्ह डान्स इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गाण्यावर सादरीकरण केले़ अनंत मांडवगणे यांनी कार्यक्रमा दरम्यान विनोदी किस्से सांगत कार्यक्रमात रंगत निर्माण केली़ मिताली पुरोहित यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला़ केदार फुलसावंगे, आदित्य नरवाडे, सुदेशना सामाले, सिद्धार्थ, रुपेश, अनिल, विनोद, रोहित, धीरज, आकांक्षा, दिलीप घुगे यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले़ गौरव सहस्त्रबुद्धे तसेच रचित सहस्त्रबुद्धे यांनीही नृत्याविष्कार सादर केला़ या कार्यक्रमाला जोडूनच गोकुळ आष्टमीनिमित्त दहीहंडी व गोपालकाला करण्यात आला़ यात उषा मुंडे यांनी प्रथम, विजया कातकडे द्वितीय, सुरेखा सालपे तृतीय क्रमांक मिळविला़ त्यांना लता वाजपेयी यांच्याकडून पारितोषिके देण्यात आली़ ओम फर्निचरच्या वतीने काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये विजेत्या ठरलेल्या प्रणिता चिटणीस, उषा देशमुख, अनिता नरवाडकर, सुलोचना वाडे, पौर्णिमा एंगडे यांना अनिता जांगीड यांच्या हस्ते गिफ्ट कुपन देण्यात आले़ कार्यक्रमासाठी वंदना पवार, अनुराधा वायकोस, सविता संगेवार, चंदाराणी लेमाडे, संगीता महाजन, गंगा चरकपल्ली, विजया खंदारे, सुनीता शहाणे यांचे सहकार्य लाभले़ (प्रतिनिधी)