‘लोकमत’च्या ‘अंताक्षरी’स उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: July 23, 2014 00:31 IST2014-07-23T00:01:11+5:302014-07-23T00:31:50+5:30

लातूर : लोकमत सखी मंचच्या वतीने दयानंद सभागृहात सोमवारी आयोजीत केलेल्या लोकमतच्या अंताक्षरी स्पर्धेस सखी मंच सदस्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

Spontaneous response to 'Antakshari' of Lokmat | ‘लोकमत’च्या ‘अंताक्षरी’स उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लोकमत’च्या ‘अंताक्षरी’स उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : लोकमत सखी मंचच्या वतीने दयानंद सभागृहात सोमवारी आयोजीत केलेल्या लोकमतच्या अंताक्षरी स्पर्धेस सखी मंच सदस्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
लोकमतच्या अंताक्षरी स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून व्दारकादास श्यामकुमारचे तुकाराम पाटील, मनोजा एजन्सीजचे प्रवीण ब्रिजवासी, बी़बी़ईटकर शॉपीचे राघवेंद्र ईटकर, प्रसिध्द निवेदक व गायक संदीप पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी घेण्यात आलेल्या अंताक्षरी स्पर्धेमध्ये बॉलीवूड, शब्दावरून गाणे ओळखणे, बझर राऊंड या तीन प्रकारात विभागणी करून स्पर्धा पार पाडण्यात आल्या़ या स्पर्धेमध्ये सखींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला़ प्रारंभी प्रसिध्द गायक पाटील यांनी आपल्या मधूर आवाजामध्ये जुनी गाणी गात जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला़ तसेच त्यांनी गायलेल्या गाण्याला प्रतिसाद देत उपस्थित सखींनी नृत्य सादर केले़ कार्यक्रमाचे प्रायोजकत्व व्दारकादास श्यामकुमार राजभोग आटा, मनोजा एजन्सी, बी़बी़ईटकर, फन अ‍ॅण्ड जॉय आणि लाईफ स्टाईल फॅशन डिझाईनिंग इन्स्टिट्यूट यांनी दिले़
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक्षा राजेमाने यांनी केले तर आभार अमोल रणखांब यांनी मानले़ (प्रतिनिधी)
पारितोषकाचे वितरण़़़
लोकमत अंताक्षरी स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या नीशा दिवाण, द्वितीय सुनीता कोंडकर, तृतीय नीलिमा तडगले, चौथा अनिता पटवारी, पाचवा विमल काळगे, सहावा अश्विनी पोतदार यांना लोकमतचे उपशाखाव्यवस्थापक नितीन खोत, गणेश कुर्लेकर, संजीव चांदगावकर, मच्छिंद्र सुडके, छगन बुरडे, प्रसन्न हिरेमठ यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले़
सखींना व्यासपीठावर मिळाली संधी़़़
लोकमत अंताक्षरी कार्यक्रमाच्या माध्यमातून सखी मंचमुळे मला व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया नीशा दिवाण यांनी व्यक्त केली़ तर लोकमत सखी मंचच्या व्यासपीठावर संधी मिळवण्यासाठी वयाची अट नसल्यामुळे मला मिळालेल्या संधीचे सोन करता आले, अशी प्रतिक्रिया सुनीता कोंडकर यांनी दिली़

Web Title: Spontaneous response to 'Antakshari' of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.