एक्स्प्रेस जलवाहिनीला भगदाड
By Admin | Updated: August 9, 2014 00:54 IST2014-08-09T00:42:56+5:302014-08-09T00:54:12+5:30
एक्स्प्रेस जलवाहिनीला भगदाड

एक्स्प्रेस जलवाहिनीला भगदाड
औरंगाबाद : सिडको-हडकोसाठी २००१ मध्ये टाकण्यात आलेल्या १२०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीला वाल्मी पाठीमागील परिसरात तीन ठिकाणी भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
जलवाहिनीच्या डागडुजीमुळे उद्या ९ आॅगस्ट रोजी सिडको-हडकोला निर्जळीचा सामना करावा लागणार असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार
आहे.
पाणीपुरवठा सुरळीत नसल्यामुळे नागरिक पाणी साठवून ठेवतात. परिणामी साथरोगांचा प्रादुर्भाव सिडको-हडकोत वाढला आहे. ७०० च्या आसपास तापाचे रुग्ण त्या भागात आढळून आले आहेत. अनियमित पाणीपुरवठा हेच मूळ कारण साथरोगांसाठी असल्याचे स्पष्ट होते.