शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार तरूणाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 20:09 IST

तरुण गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुद्ध पडला.

औरंगाबाद : स्वस्तधान्य दुकानदारांना धान्याचा पुरवठा करणाऱ्या मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना केम्ब्रीज चौक ते सावंगी वळण रस्त्यावरील गोपाळपूर फाट्याजवळ बुधवारी(दि.१९)रोजी सायंकाळी घडली.

रामेश्वर   जगदाळे (२६, ह.मु. मयूर पार्क , मूळ रा.कोलठाणवाडी)असे मृताचे नाव आहे. या अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, रामेश्वर हा नातेवाईकांच्या कन्स्ट्रक्शन साईटवर देखरेखीचे काम करायचा. बुधवारी सकाळी त्याने मित्रांसह शिवजयंती साजरी केली. दुचाकीला भगवा झेंडाही बांधला होता. यानंतर तो सायंकाळी कामानिमित्त केम्ब्रीज चौकाकडे गेला होता. तेथील काम आटोपून सायंकाळी साडेपाच पावणे सहा वाजेच्या सुमारास रामेश्वर मोटारसायकलने केम्ब्रीज चौकाकडून सावंगी बायपासने जात होता.

गोपाळपुर  फाट्याजवळ तो असताना विरुद्ध दिशेने आलेल्या स्वस्त-धान्याची वाहतूक करणाऱ्या  ट्रकने त्याला  उडवले. या घटनेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने रामेश्वर  गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुद्ध पडला. या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत रामेश्वरला घाटीत दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी रामेश्वरला तपासून मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. चिकलठाणा पोलिसांनी तरूणाला उडविणारा ट्रक जप्त केला. चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिकलठाणा ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातDeathमृत्यू