शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडवर वेगाचा थरार; दुचाकीला धडकेनंतर नियंत्रण सुटताच कार उडाली हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:50 IST

सीटबेल्टमुळे कार चालकाचा जीव वाचला; मात्र दुचाकीवरील एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसरा किरकोळ जखमी

छत्रपती संभाजीनगर : सिग्नल सुटताच सुसाट वेगात निघालेल्या कार चालकाची दुचाकीला धडक लागली. यामुळे गडबडलेल्या कार चालकाचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटले व ॲक्सिलेटरवर पाय पडून कार थेट दुभाजकावर चढून हवेत उडाली. बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता हायकोर्टासमोर हा अपघात घडला. संदेश जाधव (रा. चैतन्यनगर), असे कार चालकाचे नाव असून, प्रशांत मिसाळ या दुचाकीस्वाराच्या नाक, चेहरा व हाता-पायांना गंभीर दुखापत झाली.

प्रत्यक्षदर्शी व वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास जाधव त्यांच्या कारमधून हायकोर्ट सिग्नल सुटताच वेगात निघाले होते. हायकोर्टपासून काही अंतरावर समोरील एका दुचाकी चालकाच्या सायलेन्सरला त्यांच्या कारचा धक्का लागला. यात दुचाकीस्वार दूरवर फेकला गेला. मात्र, या घटनेमुळे संदेश यांचे कारवरील नियंत्रण सुटले. यातच त्यांनी कार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना वेग आणखी वाढला व कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात अतिवेगामुळे कार थेट दुभाजकावरील झाडाच्या कुंडीवर आदळून हवेत उडत रस्त्याच्या मध्यभागी येऊन पडली. यात कुंडीदेखील मुळापासून तुटून विरुद्ध दिशेला फेकली गेली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

सीटबेल्टमुळे प्राण वाचले, दुचाकीस्वार मात्र जखमीसंदेश यांनी सीटबेल्ट लावलेला असल्याने कार हवेत उडून खाली कोसळूनदेखील त्यांना फार इजा झाली नाही. ते सुरक्षितरीत्या स्वत:हून कारबाहेर आले. मात्र, दुचाकीस्वार प्रशांत हे गंभीर जखमी झाले. कारच्या मागेच असलेले शरद जहागीरदार (रा. कैलासनगर) यांनी दुचाकीस्वारांना बाजूला बसवत त्यांची दुचाकी बाजूला केली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर प्रशांत यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बघ्यांची गर्दी, वाहतूक खोळंबलीअपघातानंतर बघ्यांसोबत मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यांच्या गर्दीमुळे हायकोर्ट सिग्नल ते सेव्हन हिलदरम्यान वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कार रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात