शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वडवणीमध्ये मोर्चेबांधणीला वेग

By admin | Updated: August 13, 2015 00:26 IST

राम लंगे, वडवणी सर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या वडवणीमध्ये सध्या नगर पंचायतचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऐन दुष्काळी स्थितीतही राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राम लंगे, वडवणीसर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या वडवणीमध्ये सध्या नगर पंचायतचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऐन दुष्काळी स्थितीतही राजकीय हालचालींना वेग आला आहे. १७ प्रभागांसाठी २० रोजी आरक्षण जाहीर होणार आहे. या आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार वडवणीची लोकसंख्या १२ हजार ४८४ इतकी आहे. नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे नगराध्यक्ष होण्याचा पहिला मान कोणाला मिळतो ? याचीच उत्सुकता आहे. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा सध्या ग्रामपंचायतीवर होल्ड होता. त्यामुळे नगर पंचायतीतही आपलीच सत्ता हवी यासाठी सोळंके हे देखील बारीकसारीक हालचाली टिपत आहेत. दुसरीकडे भाजपाकडून माजी आ. केशव आंधळे, राजाभाऊ मुंडे यांनी कंबर कसली आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग येथे मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय रिपाइं, मनसे देखील नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. नगर पंचायतीवर झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षासह इतर पक्षांचे पदाधिकारी राजकीय आडाखे बांधत आहेत.दरम्यान, भाजपकडून गुरूप्रसाद गुरसाळी, दिनकर आंधळे, बाबरी मुंडे, श्रीमंत मुंडे, प्रेमदास राठोड तर राकाँकडून सुधीर ढोले, भारत जगताप, नवनाथ म्हेत्रे, विनोद नहार, संभाजी शिंदे, गंपू पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मनसेकडून यशवंत उजगरे, डॉ. सुधाकर आंधळे हे किल्ला लढविणार आहेत. शिवसेनेकडून विनायक मुळे, नागेश डिघे तर रिपाइंकडून महादेव उजगरे यांनी हाबूक ठोकला आहे.प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक निवडून द्यायचा आहे.४पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेक जण अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले आहेत.४काही इच्छुक उमेदवारी आपल्यालाच कशी मिळेल ? या प्रयत्नात असून, नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत.४काही मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळेल या आशेसह मतदारांची ख्यालीखुशाली विचारत असून, चहापानाचा आग्रह करीत आहेत.४तुल्यबळ उमेदवार दिल्यास चुरशीची लढत पहावयास मिळत आहे.