वडवणीमध्ये मोर्चेबांधणीला वेग

By Admin | Updated: August 13, 2015 00:26 IST2015-08-12T23:57:38+5:302015-08-13T00:26:00+5:30

राम लंगे, वडवणी सर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या वडवणीमध्ये सध्या नगर पंचायतचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऐन दुष्काळी स्थितीतही राजकीय हालचालींना वेग आला आहे.

The speed of the forearm in the Wadawani | वडवणीमध्ये मोर्चेबांधणीला वेग

वडवणीमध्ये मोर्चेबांधणीला वेग


राम लंगे, वडवणी
सर्वात छोटा तालुका म्हणून ओळख असलेल्या वडवणीमध्ये सध्या नगर पंचायतचे वारे जोरात वाहू लागले आहे. ऐन दुष्काळी स्थितीतही राजकीय हालचालींना वेग आला आहे. १७ प्रभागांसाठी २० रोजी आरक्षण जाहीर होणार आहे. या आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार वडवणीची लोकसंख्या १२ हजार ४८४ इतकी आहे. नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यामुळे नगराध्यक्ष होण्याचा पहिला मान कोणाला मिळतो ? याचीच उत्सुकता आहे. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा सध्या ग्रामपंचायतीवर होल्ड होता. त्यामुळे नगर पंचायतीतही आपलीच सत्ता हवी यासाठी सोळंके हे देखील बारीकसारीक हालचाली टिपत आहेत. दुसरीकडे भाजपाकडून माजी आ. केशव आंधळे, राजाभाऊ मुंडे यांनी कंबर कसली आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग येथे मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय रिपाइं, मनसे देखील नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. नगर पंचायतीवर झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षासह इतर पक्षांचे पदाधिकारी राजकीय आडाखे बांधत आहेत.
दरम्यान, भाजपकडून गुरूप्रसाद गुरसाळी, दिनकर आंधळे, बाबरी मुंडे, श्रीमंत मुंडे, प्रेमदास राठोड तर राकाँकडून सुधीर ढोले, भारत जगताप, नवनाथ म्हेत्रे, विनोद नहार, संभाजी शिंदे, गंपू पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मनसेकडून यशवंत उजगरे, डॉ. सुधाकर आंधळे हे किल्ला लढविणार आहेत. शिवसेनेकडून विनायक मुळे, नागेश डिघे तर रिपाइंकडून महादेव उजगरे यांनी हाबूक ठोकला आहे.
प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक निवडून द्यायचा आहे.
४पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेक जण अर्ध्या हळकुंडात पिवळे झाले आहेत.
४काही इच्छुक उमेदवारी आपल्यालाच कशी मिळेल ? या प्रयत्नात असून, नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत.
४काही मात्र उमेदवारी आपल्यालाच मिळेल या आशेसह मतदारांची ख्यालीखुशाली विचारत असून, चहापानाचा आग्रह करीत आहेत.
४तुल्यबळ उमेदवार दिल्यास चुरशीची लढत पहावयास मिळत आहे.

Web Title: The speed of the forearm in the Wadawani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.