शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

प्रशासनाची गती म्हणजे मुंगीचाही अपमान; हरिभाऊ बागडेंनी डागली तोफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 12:56 IST

गीच्या पावलानं प्रशासन चाललंय असे म्हटलं तर मुंगीचादेखील अपमान होईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने सरकारलाच घरचा आहेर दिला.

औरंगाबाद : मुंगीच्या पावलानं प्रशासन चाललंय असे म्हटलं तर मुंगीचादेखील अपमान होईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने सरकारलाच घरचा आहेर दिला. जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत बागडे यांच्यासह आ. अतुल सावे यांनीदेखील मनपाला डीपीसीतून निधी मिळत नसल्यामुळे अर्थमंत्र्यांसोबत शाब्दिक वाद घातला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा प्रकार समोर आला.

बागडे म्हणाले, शाळा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण, पाणीपुरवठा यांच्यासह अपंगांचे अर्ज, घरकुलांचे काम, या मूलभूत गोष्टींना वेळेत पूर्णत्वास नेण्याची मानसिकता यंत्रणेने जोपासली पाहिजे. शासनाने निधी देऊनही ३ ते ४ वर्षांपासून वरील कामे होत नाहीत. ही गती मुंगीच्या पावलांचादेखील अपमान करणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढे निवडणुकांना सामोरे जायचे आहे. प्रशासकीय पातळीवर कामे होत नसतील तर अवघड परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने अर्थमंत्र्यांसमोर भाजप आमदारांनी प्रशासनावर खापर फोडले. खा.चंद्रकांत खैरे, आ.संजय शिरसाट यांनी सुभेदारी विश्रामगृह, अ‍ॅमेझेमंट पार्कच्या निधीबाबत मुद्दे मांडले. 

आ. इम्तियाज जलील म्हणाले, डीपीसीतून मिळणारा निधी हद्दीमुळे मतदारसंघात खर्च करताना अडचणी येतात. निधी आम्ही आणायचा आणि दुस-या मतदारसंघात खर्च करायचा, याबाबत उपाय समोर यावेत. कृषिसेवा, सामाजिक सेवा, पाटबंधारे विभाग मिळून ४०९ कोटींची अतिरिक्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीत घोषणा केली. 

मग महापालिकेचा वर्ग बदलाआ. सावे म्हणाले, नगरोत्थानमधून मनपाला पैसे मिळत नाहीत. डीपीसीतून जास्तीचा निधी मनपाला मिळावा. यावर अर्थमंत्री म्हणाले, मनपा ‘क’ वर्गात आहे, ती ‘ड’ वर्गात करून घ्या आणि मग सरकारकडे निधी मागण्यासाठी या. नगरोत्थानमधून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा कमी पडला असेल. त्यामुळे निधी मिळाला नाही. मनपा ‘क’ वर्गात आहे, ‘ड’ वर्गात नाही. यापुढे डीपीसीतून ‘क’ वर्ग मनपाला निधी न देण्याबाबतदेखील अर्थमंत्र्यांनी बैठकीत सूतोवाच केले. 

निवडणुका निर्धारित वेळेतच९ मार्च रोजी राज्य अर्थसंकल्प सादर होईल. हा अर्थसंकल्प शेवटचा आहे की अजून एक सादर होणार. यावर अर्थमंत्री म्हणाले, शिवसेना-भाजप युतीच यापुढील सर्व अर्थसंकल्प सादर करील. शिवाय निवडणुकादेखील निर्धारित वेळेतच होतील. अडीच तासांचा पेपर आम्ही सोडणार नाही. तीन तासांचा पूर्ण पेपर सरकार देईल, असेही त्यांनी नमूद केले. 

कामे वेळेत पूर्णत्वास न्यावी शाळा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण, पाणीपुरवठा यांच्यासह अपंगांचे अर्ज, घरकुलांचे काम, या मूलभूत गोष्टींना वेळेत पूर्णत्वास नेण्याची मानसिकता यंत्रणेने जोपासली पाहिजे. शासनाने निधी देऊनही ३ ते ४ वर्षांपासून वरील कामे होत नाहीत. ही गती मुंगीच्या पावलांचादेखील अपमान करणारी आहे. - हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार