चावडीवाचन झाले पूर्ण
By Admin | Updated: June 19, 2014 00:18 IST2014-06-18T23:58:16+5:302014-06-19T00:18:16+5:30
किशोरसिंह चौव्हाण, मुखेड मनरेगाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नियोजन विभागाने प्रलंबित हजेरीपत्रकाचे चावडीवाचन करण्याच्या सूचना दिल्या आहेत़

चावडीवाचन झाले पूर्ण
किशोरसिंह चौव्हाण, मुखेड
मनरेगाची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नियोजन विभागाने प्रलंबित हजेरीपत्रकाचे चावडीवाचन करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ यानुसार ११ जून ते १५ जून पर्यंत ६० ग्रामपंचायतीअंतर्गत हजेरीपत्रकाचे चावडीवाचन करण्यात आले.
सन २०१२-१३ मधील मजुराची मजुरी मोठ्या प्रमाणात अदायगी करावयाची बाकी आहे़ त्यानुसार सन २०१३ आर्थिक वर्षात पाईपलाईनमध्ये नोंदवण्यात आलेली हजेरीपत्रके प्रलंबित आहेत़ मागील काळात ३४ ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या मनरेगाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने सिंचन विहिरीसह विविध कामाचे देयके प्रलंबित होती़ यामुळे फटका शेतकऱ्यांना व मजूरदारांना मोठ्या प्रमाणात बसला़ सिंचन विहिरीच्या कामाचे बिले अदा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती़ शेतकरी व मजुरांची मागणी लक्षात घेता अशा हजेरीपत्रकाच्या बाबतीत शासनाने शासन निर्देशाप्रमाणे चावडीवाचन करून व सामाजिक अंकेक्षण करून देयके अदा कण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ ११ ते १५ जून या कालावधीत गावात जावून पाईपलाईनमध्ये नोंदवण्यात आलेल्या हजेरीपत्रकाचे पडताळणी करणे, चावडीवाचन करणे, तपाशीलाची माहिती देणे, तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त कामे आहेत, अशा ठिकाणी प्रत्यक्ष जावून कामाची भौतिक तपासणी करून कामाचे छायाचित्र घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या व चावडीवाचनाचा अहवाल विहीत नमुन्यात भरण्यात येवून कामाच्या सद्य:स्थितीबाबतचा अधिकाऱ्याचे व तपासणी कर्मचाऱ्याने आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्याच्या सूचना करण्यात आल्या़
या कार्यक्रमासाठी परिशिष्ट अ प्रमाणे तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी व विस्तार अधिकारी या चार जणांचे संयुक्त पथक निर्माण करण्यात आले आहेत़ या तपासणीकामी प्रलंबित हजेरीपत्रक व इतर आवश्यक अभिलेखे पथकप्रमुखांना पुरवण्याची जवाबदारी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची होती.
अकुशल कामाच्या हजेरी पत्रकाचे वाचन १२ जून रोजी आंबुलगा, बेनाळ, भगनूरवाडी, भेंडेगाव, चांडोळा, चिवडी, धामणगाव, हंगरगा, हसनाळ, हिब्बट, होकर्णा, इटग्याळ, जांब बु़, कलंबर, खतगाव, लोणाळ, मांजरी, पांडुर्णी, पाळा, पिंपळगाव, सकनूर, सांगवी बेनक, सावरगाव (पी़), तुपदाळ, येवती या गावांची झाली तर १३ रोजी बामणी, बेटमोगरा, हंगरगा (खु़), होंडाळा, मोटरगा, मुक्रमाबाद, राजुरा (बु़), सुगाव (बु़) आदी गावांचे चावडी वाचन झाले.
अधिकाऱ्यांवर होती जबाबदारी
सदरील चावडीवाचनाची माहिती तहसीलदार यांनी प्राप्त करून घेवून ग्रा़पं़निहाय तपासून योग्य प्रकरणे व अनियमितता असलेल्या प्रकरणांच्या स्वतंत्र माहितीसह उपविभागीय अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे़ उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यातील तपासणी अहवालाची माहिती एकत्रितरित्या तपासून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावयाचा आहे़ तालुक्यातील चावडीवाचनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग यांची होती.