विशेष पथकाने धाडी टाकून २५ लाखांचा गुटखा केला जप्त

By Admin | Updated: June 30, 2017 00:08 IST2017-06-30T00:06:31+5:302017-06-30T00:08:38+5:30

नांदेड : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शहरातील देगलूरनाका परिसरात तीन ठिकाणी धाडी टाकून जवळपास २५ लाखांचा गुटखा जप्त केला़

Special teams seized Rs 25 lakh worth of gutkha by throwing money | विशेष पथकाने धाडी टाकून २५ लाखांचा गुटखा केला जप्त

विशेष पथकाने धाडी टाकून २५ लाखांचा गुटखा केला जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शहरातील देगलूरनाका परिसरात तीन ठिकाणी धाडी टाकून जवळपास २५ लाखांचा गुटखा जप्त केला़ ही कारवाई गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती़
विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी माळटेकडी परिसरातील सिटीएक्स ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोडाऊनवर धाड टाकून जवळपास १० लाखांचा गुटखा जप्त केला़
सदर माल हैदराबाद येथून रेल्वेने आल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती़ त्याचबरोबर देगलूर नाका परिसरातील आरीफ किराणा येथे धाड टाकून जवळपास १२ लाख रूपयांचा आणि अली जर्दा स्टोअर्स येथून ३ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे़ सदर तीनही ठिकाणी विशेष पथकाने धाडी टाकून एकूण २५ लाख रूपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे़ पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यासह लाठकर, निरणे, कुलकर्णी, जिंकलवाड, वानखेडे, पायनापल्ले, कंधारे आदींचा समावेश होता़

Web Title: Special teams seized Rs 25 lakh worth of gutkha by throwing money