विशेष पथकाने पकडला १ क्विंटल ११ किलो गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:00+5:302021-02-05T04:20:00+5:30

औरंगाबाद : चोरट्या मार्गाने विक्रीसाठी शहरात आणला जाणारा तब्बल १ क्विंटल ११ किलो ७० ग्रॅम गांजा पोलीस आयुक्तांच्या ...

Special team seized 1 quintal 11 kg of cannabis | विशेष पथकाने पकडला १ क्विंटल ११ किलो गांजा

विशेष पथकाने पकडला १ क्विंटल ११ किलो गांजा

औरंगाबाद : चोरट्या मार्गाने विक्रीसाठी शहरात आणला जाणारा तब्बल १ क्विंटल ११ किलो ७० ग्रॅम गांजा पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून पकडला. केंब्रिज चौकात रात्री दोन वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत तीन तस्करांना अटक करण्यात आली. ॲटो रिक्षा, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम आणि गांजा असा तब्बल २५ लाख ८२ हजार ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शेख शोएब शेख मुनीर (वय २०, रा. रहेमानिया कॉलनी), बख्तियार खान जहांगीर खान ऊर्फ राजा आणि शेख शहारुखशेख समद (२३, रा. असेफिया कॉलनी, टाउन हॉल) अशी आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, एका एलपीजी रिक्षामधून गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्तांना दिली. यानंतर त्यांच्या निर्देशानुसार आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, हवालदार सय्यद शकील, विजय निकम, इमरान पठाण, ए. आर. खरात, मनोज विखनकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री सापळा रचला. मध्यरात्रीनंतर २:३० ते ३ वाजेच्या सुमारास तेव्हा संशयित रिक्षा आणि दुचाकी सोबत जाताना दिसली. यानंतर तेथील एका दुकानासमोर संशयित रिक्षा आणि दुचाकी पकडली. तेव्हा पंचासमक्ष रिक्षाची झडती घेतली असता रिक्षामध्ये आरोपी शोएब , बख्तियार खान बसलेले दिसले. रिक्षात लपवून ठेवलेला तब्बल १११ किलो ७० ग्रॅम गांजा आढळून आला. आरोपी बख्तियारजवळ ३४ हजार ५३० रुपये रोख, १६ हजार ५०० रुपयांचा मोबाईल, शहारुखजवळ १ लाख ८० हजार रुपयांची रिक्षा, ९० हजारांची दुचाकी, ११ हजार ५०० रुपयांचा मोबाईल आणि गांजा असा एकूण २५ लाख ८२ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Special team seized 1 quintal 11 kg of cannabis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.