भ्रूण हत्या रोखण्यासाठी विशेष योजना
By Admin | Updated: November 4, 2014 01:38 IST2014-11-04T00:33:04+5:302014-11-04T01:38:24+5:30
बीड : शिक्षण व आरोग्य विभागात धोरणात्मक योजना राबवायच्या आहेत़ जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लवकरच विशेष योजना राबविणार असून त्याचा कृती आराखडा आठ दिवसात तयार होईल,

भ्रूण हत्या रोखण्यासाठी विशेष योजना
बीड : शिक्षण व आरोग्य विभागात धोरणात्मक योजना राबवायच्या आहेत़ जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी लवकरच विशेष योजना राबविणार असून त्याचा कृती आराखडा आठ दिवसात तयार होईल, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांची उपस्थिती होती़ सोनवणे म्हणाले, शिक्षण विभागात अनियमितता झाली आहे काय याची खातरजमा करण्यात येईल़ बिंदू नामावली अद्ययावत करण्यात आली असून आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक अतिरिक्त ठरणार नाहीत़ कारण आऱ टी़ ई़ नुसार शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त झाल्या आहेत़ शिक्षण विभागात अनियमिततेला थारा देणार नाही़ अधिकारी व शिक्षकांवर अंकुश ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले़ केंद्रांची पुनर्रचना करणार
शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही, असे सभापती बजरंग सोनवणे यांनी सांगितले़ सध्या केंद्रांतर्गत २० ते २५ शाळा आहेत़ त्यामुळे नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही़ त्यासाठी केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे़ एका केंद्रामध्ये ८ ते १० शाळांचा समावेश करण्यात येईल़
एम़ ओ़ २४ तास उपलब्ध
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुजू होऊन उच्च शिक्षणासाठी पगारी रजेवर जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोनवणे म्हणाले़ साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या असून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तालुकानिहाय जबाबदारी निश्चित केली आहे़
वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध राहतील़ आरोग्य केंद्रांतील शस्त्रक्रिया विभाग, शवविच्छेदन विभाग अद्यावत करण्यात येईल, रुग्णांना अडचण आल्यास माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले़ (प्रतिनिधी)
जि़ प़ उपाध्यक्षा आशा दौंड यांनी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली़
४पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरूस्तीसाठी आलेले १ कोटी १७ लाख रूपये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडकलेले आहेत़ ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्षा दौंड म्हणाल्या़
४कृषी व पशुसंवर्धन हा महत्वाचा विभाग आहे़ मात्र केवळ ७ लाख रूपये निधीची तरतूद केली आहे़ अहमदनगर जि़ प़ च्या धर्तीवर निधी १ कोटी रूपयांपर्यंत वाढवून घेण्यात येईल़
४शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे त्या म्हणाल्या़