विशेष चौकशी पथक दाखल
By Admin | Updated: August 7, 2014 00:17 IST2014-08-07T00:15:01+5:302014-08-07T00:17:03+5:30
ंऔंढा नागनाथ : येथील ग्रामीण रूग्णालयात ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना व गरोदर मातांना दिली जाणारी विविध लस खराब झाल्याप्रकरणी जिल्हास्तरावरील आरोग्य पथक चौकशीसाठी औंढ्यात दाखल झाले आहे.

विशेष चौकशी पथक दाखल
ंऔंढा नागनाथ : येथील ग्रामीण रूग्णालयात ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना व गरोदर मातांना दिली जाणारी विविध लस खराब झाल्याप्रकरणी जिल्हास्तरावरील आरोग्य पथक चौकशीसाठी औंढ्यात दाखल झाले आहे. त्यांनी खराब झालेल्या लस चौकशीसाठी नमुने घेतले असल्याची माहिती आहे.
मुलांना जन्मताच दिल्या जाणारे तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील व गरोदर मातांना ग्रामीण रूग्णालयातून प्रत्येक मंगळवारी पोलिओ, क्षय, ग्रोवर, कावीळ, धनुर्वात, डांग्या खोकला या विविध व्हिटॅमिनसारख्या रोगप्रतिबंध लस देण्यात येतात; परंतु रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांंच्या दुर्लक्षामुळे शितसाखळी बंद पडल्याने सुमारे ६ हजार २५० बाटलीमधील लस देणारे औषध खराब झाले होते. एका बाटलीमधून १० बालकांना लस पुरेल एवढे औषध असते. लस खराब झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी
डॉ. गोपाल कदम, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक बनसोडे, वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनचे जिल्हा समन्वयक पुष्कर देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी औंढा येथे ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली.
रूग्णालयातील लसीकरण करण्यात येणाऱ्या खोलीची पाहणी करून त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या लसचे तपासणीसाठी नमुने घेतले. खराब झालेल्या लसबाबत अद्याप कोणीही जबाबदारी घेण्यास पुढे येत नसून चौकशीअंतीच यामधील सत्य बाहेर येणार आहे. (वार्ताहर)