वर्ल्ड बँकेच्या मदतीने विशेष प्रयोग
By Admin | Updated: July 14, 2016 00:59 IST2016-07-14T00:29:15+5:302016-07-14T00:59:48+5:30
जालना : जिल्हा गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. वर्ल्ड बँकेच्या विशेष निधीतून मराठवाड्यातील दोन हजार गावांत हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

वर्ल्ड बँकेच्या मदतीने विशेष प्रयोग
जालना : जिल्हा गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करत आहे. वर्ल्ड बँकेच्या विशेष निधीतून मराठवाड्यातील दोन हजार गावांत हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील गावांचाही यात समावेश करण्यात आला आहे. संवदनेक्षम हवामान अधारित शेती प्रयोग असून, बुधवारी वर्ल्ड बँकेच्या दोन प्रतिनिधींनी बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
या प्रयोगासाठी जिल्ह्यातील गावांची निवड होणार असून, तेथील दुष्काळाचा परिपूर्ण अभ्यास करून ही निवड करण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग, पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यासाठी करावी लागणारी शास्त्रशुद्ध उपाययोजना, जलयुक्त शिवार योजनेतंर्गत साचलेले पाणी कसे उपयोगात आणता येईल आदी कामे यातून होणार आहे.
कडेगाव येथे वर्ल्डबँकेचे फिलीपीन्स येथील पॅट्रीक मणिला, कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, राजकुमार आळसे, पी.डी. आत्मा, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे वासरे, बदनापूर तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील यांच्यासह कृषी विभागतील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)