‘जोर से बोलो, जय महावीर...!’ औरंगाबाद शहर महावीरमय...
By Admin | Updated: April 20, 2016 00:48 IST2016-04-20T00:40:04+5:302016-04-20T00:48:35+5:30
धार्मिक : भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

‘जोर से बोलो, जय महावीर...!’ औरंगाबाद शहर महावीरमय...
औरंगाबाद : औरंगाबादेतील सकल जैन समाजाची ख्याती देशभर पोहोचली त्या भगवान महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने शहर महावीरमय बनले. विविधता, एकता, भक्ती व शिस्तीचे दर्शन या विराट शोभायात्रेतून घडले. उल्लेखनीय म्हणजे जैन धर्मीयच नव्हे, तर इतर समाजातील लोकांनीही यात सहभागी होऊन शोभायात्रेचा उत्साह द्विगुणित केला.
शहरात भगवान महावीर जयंती अपार उत्साहात साजरी करण्यात आली. सकल जैन समाजांतर्गत भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने पैठणगेट येथून निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आनंदोत्सव साजरा करीत असताना सकल जैन समाजाने दुष्काळाचे भान ठेवीत शोभायात्रेच्या खर्चाला मोठा फाटा दिला व त्या रकमेतून चारा छावणी, गो-शाळांना चारा पुरविण्यात आला. शोभायात्रेची सांगता शहागंजातील गांधी पुतळा चौकात झाली. या शोभायात्रेने अन्य समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.