जागा लाटण्याचा डाव

By Admin | Updated: July 24, 2015 00:49 IST2015-07-24T00:15:21+5:302015-07-24T00:49:37+5:30

बीड : शहरातील खासबाग परिसरातील वनविभागाच्या जागेत नगर परिषदेने गाळे उभारल्याचा वाद उफाळला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी

Space shutdown | जागा लाटण्याचा डाव

जागा लाटण्याचा डाव


बीड : शहरातील खासबाग परिसरातील वनविभागाच्या जागेत नगर परिषदेने गाळे उभारल्याचा वाद उफाळला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याचे उत्तर न दिल्याने हे प्रकरण आता चिघळले आहे.
वनविभागाच्या मालकीची ३.९३ हेक्टर आर जमीन आहे. १९८२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नर्सरीसाठी ही जागा दिली होती. त्यावेळी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग हे स्वतंत्र होते. दरम्यान, १९९५-९६ च्या कालावधीत नगर परिषदेने वनविभागाच्या जागेवर गाळे बांधले होते. हे गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पीटीआरवर मालकाचे नाव मुख्याधिकारी, नगर परिषद असे नमूद करण्यात आले आहे.
पालिकेने खासबाग येथील वनविभागाच्या परिसरात डिसेंबर २०१४ मध्ये ठराव घेतला होता. फेब्रुवारी २०१५ मध्ये या जागेचा ताबा एका संघटनेला देत पीटीआर दिले होते. या गाळ्यामध्ये वनविभागाने काही साहित्य ठेवले होते. बुधवारी सकाळी फारूक पटेल व काही जण तेथे आले व त्यांनी गाळ्याचे कुलूप तोडून भिंत पाडली. हे गाळे आपल्याला लीजवर दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वाद उफाळून आला होता. पोलिसांना माहिती देताच फौजफाटा येथे दाखल झाला होता. वनविभागाचे अधिकारी नगर परिषदेमध्ये गेले होते. मात्र, तेथे मुख्याधिकारी नव्हते. त्यामुळे त्यांनी नगर रचनाकार जैन यांच्याशी संपर्क साधून या जागेचा नकाशा दाखविला.
पीआर कार्ड वनविभागाच्या नावे
नगर परिषदेमार्फत देण्यात येणारे पीटीआर हे कर आकारणीस पात्र असलेल्या इमारती व जमिनीच्या कर आकारणी सूची दर्शविणारे असते. शहर भूमापन यांच्या आखीव पत्रिका अर्थात पीआर कार्डनुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून संयुक्त मोजणी अहवाल सादर केल्यानंतर ३.९३ हेक्टर आर जमीन वनविभागाच्या मालकीची आहे.
वनविभागाने केला होता मुख्याधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड येथील खासबाग फॉरेस्ट गट क्रमांक १३०, १३१, १३३ मधील ३.९३ हेक्टरपैकी २.९२ हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष मोजणी जिल्हा निरीक्षक अभिलेख यांनी ४ सप्टेंबर १९८२ रोजी केली होती. संयुक्त मोजणी अहवाल केल्यानुसार वनविभागाने जमीन ताब्यात घेतली आहे. सदर क्षेत्रात वनअधिनियम १९२७ व भारतीय वन अधिनियम १९८० कलम लागू झाला आहे. गाळ्याशिवाय एका उर्दू प्राथमिक शाळेस जागा भाडेतत्वावर नगर परिषदेमार्फत देण्यात आलेली आहे. सर्व्हे नं. १३३ पैकी २५०० चौरस फूट आकाराची जागा शाळेचे मैदान विकसित करण्यासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. मात्र चतु:सीमा चुकीची दर्शविण्यात आलेली आहे. वनविभागाची मालकी व ताबा असलेल्या जागेवर सदरील व्यक्ती आपल्या चुकीच्या पत्रानुसार व दस्तऐवजानुसार अतिक्रमण करीत आहे, असे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
गाळेधारकांनी वाद निर्माण केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी नगर परिषदेत गेले होते. त्यावेळी नगर परिषदेचे अधिकारी ही जमीन आपली असल्याचे सांगत असताना तेथे सलीम ट्रेसर आले. ही जागा आपली असल्याचा दावा केला. नगर रचनाकार जैन यांच्या लक्षात हा प्रकार आला. सलीम ट्रेसरमध्ये हस्तक्षेप करीत होते, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
१९८२ साली ही जागा वनविभागास देण्यात आली होती. मात्र, अनाधिकृतरित्या नगर परिषदेने येथे गाळे बांधले आहेत.
४ बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास माजी उपनगराध्यक्ष फारूक पटेल, मौलाना जकीर, सिद्दीकी युसूफ सिद्दीकी व इतर अनोळखी व्यक्ती तेथे गेले व त्यांनी गाळ्याला वनविभागाने लावलेले कुलूप तोडून भींत पाडण्याचा प्रयत्न केला. त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
४शहर ठाण्यात वनविभागाकडून सखाराम प्रल्हाद कदम यांच्या फिर्यादीवरून फारूक पटेल, मौलाना जकीर, सिद्दीकी युसूफ सिद्दीकी व अन्य लोकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Space shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.