एसपी आॅफिसचा बदलतोय ‘लूक’
By Admin | Updated: June 27, 2017 00:37 IST2017-06-27T00:36:24+5:302017-06-27T00:37:27+5:30
बीड : स्वातंत्र्य दिनापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय आयएसओ बनविण्याच्या दृष्टिकोनातून कामांना गती देण्यात आली आहे.

एसपी आॅफिसचा बदलतोय ‘लूक’
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वातंत्र्य दिनापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालय आयएसओ बनविण्याच्या दृष्टिकोनातून कामांना गती देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १५ पोलीस ठाणे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वीच आयएसओ बनविण्याचा संकल्प जिल्हा पोलीस प्रशासनाने केला आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाचाही समावेश आहे. सध्या अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या कक्षाचे काम गतीने सुरू आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर कार्यालयात येणाऱ्यांची नोंद न चुकता केली जात आहे. कोण आले? कधी आले?, कोणत्या कामासाठी आले?, कोणाला भेटायला आले?, या सर्व बाबींची नोंद मुख्य प्रवेशद्वारावरच घेतली जात आहे. येथे एक पुरुष कर्मचाऱ्यासह दोन महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.