सोयाबीनने कृषि उत्पन्न बाजार समिती फुल्ल
By Admin | Updated: November 4, 2016 00:02 IST2016-11-03T23:57:44+5:302016-11-04T00:02:26+5:30
लातूर : पाडव्यापासून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, गुरूवारी तब्बल ६० हजार ३७४ क्विंटलची आवक होती़

सोयाबीनने कृषि उत्पन्न बाजार समिती फुल्ल
लातूर : पाडव्यापासून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून, गुरूवारी तब्बल ६० हजार ३७४ क्विंटलची आवक होती़ सौदा २ हजार ९३० रूपयांचा निघाला असला तरी पोटलीतून सर्वसाधारण भाव २ हजार ७८० पासून २ हजार ३६० पर्यंत मिळाला आहे़ भाव चांगला मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी कायम आहे़
लातूरची कृषि उत्पन्न बाजार समितीत पाडव्यापासून शेतकऱ्यांची गर्दी असून, पाडव्यादिवशी १२ हजार ६६० क्विंटल सोयाबीनची आवक होती़ गुरूवारी मात्र ही आवक पाच पटीने वाढली असून, ६० हजार ३७४ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते़ पाणी भरलेले दाने आणि डाग असल्याच्या कारणावरून हमीभाव मिळत नाही़ उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे़ मात्र डागाळल्याचे कारण देत भाव कमी दिला जात आहे़ यामुळे शेतकरी नाराज आहेत़ सध्या रबी पेरणीचा हंगाम असून, पेरणीला खर्च लागणार म्हणून शेतकरी नाविलाजाने सोयाबीन विक्रीला आणत आहेत़ गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)