सोयाबीन पिकाचा पेरा वाढला; सूर्यफूल-करडी नामशेषाच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:04 IST2021-07-09T04:04:41+5:302021-07-09T04:04:41+5:30

खरीप हंगामात सूर्यफूल हे मुख्य पीक होते. मात्र, त्यानंतर कापूस पिकामुळे चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला. त्यानंतर मागील दशकात ...

Sowing of soybean crop increased; On the way to sunflower-gray extinction | सोयाबीन पिकाचा पेरा वाढला; सूर्यफूल-करडी नामशेषाच्या मार्गावर

सोयाबीन पिकाचा पेरा वाढला; सूर्यफूल-करडी नामशेषाच्या मार्गावर

खरीप हंगामात सूर्यफूल हे मुख्य पीक होते. मात्र, त्यानंतर कापूस पिकामुळे चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला. त्यानंतर मागील दशकात सोयाबीन या पिकाचा पेरा करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली. सोयाबीन पिकास मिळणारा चांगला भाव, कापसाच्या तुलनेत करावे लागणारे कमी कष्ट व सोयाबीन निघाल्यानंतर रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडीसाठी मिळणारे क्षेत्र यामुळे सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत. पुढील हंगामात सोयाबीन पिकाचे क्षेत्र कापूस पिकापेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

---

कोट

नगदी पिकांचे वाढलेले क्षेत्र व सूर्यफूल या पिकावर झालेला रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सूर्यफूल-करडी यासह इतर तेलपिकांचा पेरा घटला आहे. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन होत असल्यामुळे त्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. - वैशाली पवार, मंडळ कृषी अधिकारी, खुलताबाद.

शेतकऱ्यांना जे परवडते तो बदल शेतात करणे गरजेचे आहे. त्यामुळे सूर्यफूल व करडीसारखी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी स्वयंपाकासाठी घाण्यावरील करडी तेलाचा वापर करावा. जेणेकरून बाजारातील भेसळयुक्त तेलापासून बचाव होईल. करडीचे क्षेत्रदेखील वाढेल. - बापूसाहेब चंद्रटिके, शेतकरी.

Web Title: Sowing of soybean crop increased; On the way to sunflower-gray extinction