१८०० हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या
By Admin | Updated: October 25, 2014 23:47 IST2014-10-25T23:36:28+5:302014-10-25T23:47:59+5:30
लोहारा : तालुक्यात पावसाअभावी रबी हंगामातील १८०० हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत़ पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून,

१८०० हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या
लोहारा : तालुक्यात पावसाअभावी रबी हंगामातील १८०० हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत़ पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला असून, रबीतही निसर्गाचा कोप कायम असल्याने शेतकरी संकटाच्या फेऱ्यात अडकल्याचे चित्र लोहारा तालुक्यात दिसत आहे़
गतवर्षीपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस होत आहे़ त्यामुळे रबीसह खरीप हंगामावर याचा विपरित परिणाम झाला असून, शेतकरी आर्थिक विंवंचनेत अडकला आहे़ कानेगाव, नागूर, भातागळी, कास्ती, मार्डी, आरणी भागातील शेतकऱ्यांनी तर खरिपाची पेरणी केली नव्हती़ त्यात आता रबी हंगामासाठी लागणाऱ्या पावसानेही हुलकावणी दिल्याने रबीची पेरणीही खोळंबली आहे़ अपेक्षीत पाऊस झाला नाही तर रबीची पेरणी करायची की नाही ? हा यक्षप्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा आहे़ त्यात काही प्रमाणात खरीप हंगामातील तूर सध्या फुलोऱ्यात असून, या पिकालाही पावसाची गरज आहे़ पाऊस झाला तरच तुरीचे काही प्रमाणात उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे़ गतवर्षीचे दोन्ही हंगामासह यंदाच्या खरीपापाठोपाठ रबीवरही निसर्गाचा कोप झाल्याने शेतकरी वर्ग मात्र, मोठा हवालदिल झाला आहे़
(वार्ताहर)४
निसर्गाचा सततचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे़ यावर्षी पाऊस नसल्याने खरिपातील पेरणीचे पैसेही निघालेले नाहीत़ पाऊस नसल्याने रबी हंगामाच्या पेऱ्याचीही चिंता आहे़ दोन वर्षाच्या हंगामात शेतकरी शंभर टक्के नुकसानीत असल्याचे शेतकरी शरणाप्पा कबाडे, विजयकुमार लोमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़