७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी

By Admin | Updated: September 5, 2014 00:08 IST2014-09-04T23:55:39+5:302014-09-05T00:08:50+5:30

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

Sowing at 7 lakh 38 thousand hectare | ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी

७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु उशिरा झालेल्या पावासामुळे जिल्ह्यातील काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने जवळपास ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे.
यापूर्वी अधून-मधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढावले. तर काही शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात २८ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून आजघडीला खरीपातील ७ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले आहे.
जिल्ह्यात ७ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी २८ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरा झाला असून अद्यापही ४० हजार एकरवर पावसाअभावी पेरण्या झाल्याच नाहीत. आता पाऊस पडला असला तरी पेरणीचा हंगाम संपल्यामुळे पेरणी करुनही पीक हातात पडेल की, नाही याची शाश्वती नाही, यामुळे उर्वरित असलेल्या क्षेत्रावर पेरणी होणे शक्य नाही. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या १५१ टक्के प्रमाण आहे. तूर ५४ हजार ६०० हेक्टर, उडिद २० हजार ७०० हेक्टर, मूग १९ हजार ८०० हेक्टर, ज्वारी ५७ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ९३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे.
गतवर्षी सप्टेबर महिन्यात पीके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत.
तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २७२०० हेक्टर, अर्धापूर २१३००, मुदखेड १८ हजार, लोहा ६६८००, कंधार ५०२००, देगलूर ४८८००, मुखेड ७६५००, नायगांव ४१४००, बिलोली ४३ हजार हेक्टर, धर्माबाद २३३००, किनवट ७३७००, माहूर ३२६००, हदगांव ७५१००, हिमायतनगर २७८००, भोकर ४६९०० हेक्टरवर तर उमरी तालुक्यात ३०५०० हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
यापुढे पाऊस पडला तरी पेरणी केलेले पीक येण्याचा हंगाम संपल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलीतरी उत्पादन चागंले येण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगल उभा राहिला आहे.
(प्रतिनिधी)
पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

Web Title: Sowing at 7 lakh 38 thousand hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.