६ लाख हेक्टरवर पेरण्या

By Admin | Updated: August 1, 2014 01:06 IST2014-08-01T00:37:48+5:302014-08-01T01:06:36+5:30

रामेश्वर काकडे, नांदेड दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली.

Sowing on 6 lakh hectares | ६ लाख हेक्टरवर पेरण्या

६ लाख हेक्टरवर पेरण्या

रामेश्वर काकडे, नांदेड
दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली. यामुळे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात जवळपास ७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५ हजार ५०० हेक्टरवर पेरा झाला असून काही भागात पावसाअभावी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरा झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ६२ हजार ३०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०४ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून एकूण क्षेत्राच्या ११६ टक्के आहे. तूर ५३ हजार ५०० हेक्टर, उडिद १७ हजार ८०० हेक्टर, मूग १६ हजार ५०० हेक्टर, ज्वारी ४८ हजार ९०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यातील परण्या झालेल्या क्षेत्रापैकी जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली आहे.
गतवर्षी ३१ अखेर १०८ टक्के पेरण्या होऊन पीकेही तोऱ्यात डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळे खोळंबल्या आहेत. यासाठी अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतिक्षा बळीराजाला लागली आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने अजूनही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
३१ जुलैपर्यंत तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २६२०० हेक्टर, बिलोली ४३००० हेक्टर, मुखेड ३२८०० हे., कंधार ४९३०० हे., लोहा ६४३०० हे., हदगांव ५१९०० हे., भोकर ५४ हजार हेक्टर, देगलूर ४२४०० हे., किनवट ७१७००, मुखेड १८ हजार, हिमायतनगर २७८००, माहूर ३२६००, धर्माबाद २३३००, उमरी २९१००, अर्धापूर १७६००, नायगांव ३९९०० हेक्टर याप्रमाणे जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५५०० हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या.
एकूण क्षेत्राच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या अधून-मधून बरसत असलेल्या पावसावर शेतकरी पेरण्या आटोपून घेत असले तरी काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी ४० टक्के पेरणी मुखेड तालुक्यात झाली आहे.
पावसा तुझे वागणे ़़़
सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लपंडावाचे नांदेडचे कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या शब्दात यथार्थ वर्णन केले आहे़
पावसा तुझे वागणे
कोणत्याही तर्कात बसत नाही,
आमचे माणसांचे सोड़़़पण
जमिनीत चिणल्या जात असलेल्या
लाखो-करोडो बियांसाठी तुझ्या
डोळ्यात पाण्याचा टिपूसही येऊ नये़़़
तू अशी ओलच हरवून बसलास
तर खोलवर काहीही ऊतरणार नाही
़़़झाडं मुळासहित अन् माणसे
मुळाबरहुकूम कोसळतील़़़

Web Title: Sowing on 6 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.