साऊथसिटीत स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:40 IST2019-03-04T22:40:18+5:302019-03-04T22:40:28+5:30
सिडको वाळूज महानगरातील साऊथसिटीत सामाजिक विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबवत स्वच्छतेविषयी जनजागृती केली.

साऊथसिटीत स्वच्छता अभियान
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील साऊथसिटीत सामाजिक विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबवत स्वच्छतेविषयी जनजागृती केली.
सामाजिक विचारमंच्या वतीने रविवारी स्माशानभूमी व परिसरात स्वच्छता करण्यात आली. जवळपास एक ट्रॅक्टर केर-कचरा जमा करण्यात आला. यावेळी परिसरातील झाडांचा पाला-पाचोळा गोळा करुन झांडाना आळे करण्यात आले. संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात उद्योजक किशोर पाटील, अॅड. कमलाकर तांदुळजे, नारायण हातोळे, डॉ.अमोल काकडे, राजेश देशमुख, मंचचे सचिव केशव ढोले, वैशाली अवघडे, श्रद्धा आंबेकर, वंदना तुपे, मिनाक्षी मालोदे, दिलीप दबडे, शिवाजी राऊत, रमेश तुपे, नवनाथ राजे, अमर निकम, संतोष चव्हाण, प्रदीप माळी आदींसह ५० तरुण-तरुण, महिला व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला होता.