साठे, फुले, नाईक, संत रोहिदास महामंडळाचे कर्ज माफ करा
By Admin | Updated: July 1, 2017 00:25 IST2017-07-01T00:21:54+5:302017-07-01T00:25:48+5:30
नांदेड : राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्याप्रमाणे विविध मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करावे, यासाठी ३० जून रोजी भीमशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले.

साठे, फुले, नाईक, संत रोहिदास महामंडळाचे कर्ज माफ करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्याप्रमाणे विविध मागासवर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करावे, यासाठी ३० जून रोजी भीमशक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महात्मा फुले, वसंतराव नाईक, संत रोहिदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळांकडून वाटप करण्यात आलेले कर्ज त्वरित माफ करावे, नोटाबंदीमुळे लघुउद्योग मोडकळीस आले असून लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे़ घनकचरा व्यवस्थापन कामाची नियमबाह्य निविदेची उच्चस्तरीय चौकशी करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. महामंडळाचे कर्ज घेतलेले लाभार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून त्यांचे व्यवसाय डबघाईला आल्यामुळे कर्जाची परतफेड करणे अशक्य असल्याचेही म्हटले आहे.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, शत्रुघ्न वाघमारे, सुखदेव चिखलीकर, शाहीर आनंद कीर्तने, बालाजी भोरगे, लालबा, घाटे, गणेश तादलापूरकर, आकाश कांबळे, शिवराज गायकवाड, भारत मगरे, संजय कौठेकर, सुरेश हटकर, मधुकर गच्चे, सत्यपाल नरवाडे, संजय गोटमुखले, पत्रकार भवरे, विश्वंभर कांबळे, मोहन सोनकांबळे, साहेबराव लोखंडे आदी सहभागी झाले होते.