आरटीओमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान
By Admin | Updated: August 21, 2014 00:20 IST2014-08-21T00:17:58+5:302014-08-21T00:20:09+5:30
शिवाजी राजूरकर, नवीन नांदेड सुमारे ९ एकर क्षेत्रफळात तयार झालेली नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात भव्य आणि अद्ययावत अशी वास्तू असणार आहे.

आरटीओमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान
शिवाजी राजूरकर, नवीन नांदेड
सुमारे ९ एकर क्षेत्रफळात तयार झालेली नांदेडच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात भव्य आणि अद्ययावत अशी वास्तू असणार आहे. सुमारे ११ कोटी ८४ लाख रुपये इमारतीवर खर्च झाले आहेत. ही इमारत नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी- सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उत्तम उदाहरण आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांच्या दैनंदिन जीवनातल्या आवश्यक अशा मूलभूत सुविधाही येत्या काही दिवसात अनुभवता येतील. यामध्ये बँक, एटीएम, टी.व्ही., कॉन्फरन्स रुम आदींचा समावेश असणार आहे. या सुविधांमुळे कामाला गती प्राप्त झाली असून, कार्यालयीन कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे. कार्यालयात चालकांना उत्तम ड्रायव्हिंग आणि मानवीय, सामाजिक मूल्यांशी अवगत करण्याच्या हेतूने प्रशिक्षण कक्ष तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी रोड सेफ्टी मॉड्युलच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाील. लवकरच इमारतीच्या आवारात सिम्युलेटर यंत्रासाठी विशेष हाौल तयार करण्यात येणार असून, शिकाऊ चालकांना ड्रायव्हींगविषयी माहिती दिली जाणार आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नांदेड येथे १ आॅक्टोंबर २००३ पासून कार्यान्वित झाले आहे. कार्यालयात वाहन नोंदणी व अनुज्ञप्तीसाठी संगणकीकृत व अत्याधुनिक वाहन व सारथी प्रणाली कार्यरत आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ओरीयंटची संगणक चाचणी प्रणाली व पक्या अनुज्ञप्तीसाठी नवीन इमारतीमध्ये अत्याधुनिक चाचणी पथक तयार करण्यात आले.
या इमारतीचे उद्घाटन उद्या दि.२१ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, पालकमंत्री डी.पी. सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, परिवहन आयुक्त एस.बी. सहस्त्रबुद्धे, जिल्हाधिकारी धीरजकुमार आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे विनोद सगरे यांनी सांगितले.