लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच बसविले नवीन रोहित्र
By | Updated: December 4, 2020 04:08 IST2020-12-04T04:08:29+5:302020-12-04T04:08:29+5:30
महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित असल्याने केऱ्हाळाचे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. गिरण्याही बंद असल्याने नागरिकांना धान्य दळण्यासाठी इतरत्र जावे लागत होते. ...

लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच बसविले नवीन रोहित्र
महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित असल्याने केऱ्हाळाचे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. गिरण्याही बंद असल्याने नागरिकांना धान्य दळण्यासाठी इतरत्र जावे लागत होते. याची दखल घेत लोकमतने बुधवारच्या अंकात ‘अपुरा वीजपुरवठा : गिरणीचालकांचे हाल’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने बुधवारी दुपारीच तेथे नवीन रोहित्र आणून बसविले. यामुळे नागरिकांनी लोकमतचे आभार मानले.
फोटो बातमीचे कात्रण