शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून १२५ कोटींची घोषणा होताच सत्ताधाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 15:41 IST

दोन दिवसांत १२५ कोटी रुपयांतून कोणते रस्ते करण्यात येतील, त्याचा प्रस्ताव मनपाकडून मंत्रालयात सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देडिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांना प्रतिसाद मिळेना शासनाकडे नवीन अनुदानासाठी प्रस्ताव देणार

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी १२५ कोटी रुपयांची घोषणा केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला १२५ कोटींचे स्वप्न पडू लागले आहे. शुक्रवारी ताबडतोब रस्त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू करावे, अशा सूचना प्रशासनाला सत्ताधाऱ्यांनी दिल्या. दोन दिवसांत १२५ कोटी रुपयांतून कोणते रस्ते करण्यात येतील, त्याचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे व इतर प्रस्तावही दिले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी आणखी १२५ कोटी रुपये विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्याची घोषणा केल्याने सत्ताधाऱ्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. दोन महिन्याच्या आत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणयाची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने रस्त्यांची यादी करून शासनमंजुरी घेण्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. 

६८ कोटी रुपयांच्या डिफर्ड पेमेंटच्या रस्ते कामांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दीड वर्षापूर्वी १०० कोटींचा निधी शासनाने रस्त्यांसाठी मंजूर केला, त्या कामांचे भूमिपूजन ३ जानेवारी रोजी करण्यात आले. १०० कोटींच्या रस्त्यांसह पालिकेने स्वत:च्या निधीतून डिफर्ड पेमेंटवर ५० कोटींचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ फिरविली आहे. डिफर्ड पेमेंटच्या या २१ रस्त्यांचे सुधारित अंदाजपत्रक ६८ कोटी झाले आहे. या कामांसाठी निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. आता फेरनिविदा मागविण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. शंभर कोटींच्या कामांत ३० रस्त्यांचाच समावेश झाला. त्यामुळे उर्वरित नगरसेवकांना डिफर्ड पेमेंटमधून त्यांच्या वॉर्डातील रस्ते करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले; परंतु निविदांना कंत्राटदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे नगरसेवकांत नाराजी आहे. डिफर्ड पेमेंटचे रस्ते रद्द करावेत, १२५ कोटींच्या प्रस्तावात आमचे रस्ते घ्यावेत, अशी मागणीही नगरसेवक करीत आहेत. 

महापौर म्हणाले; सर्व प्रस्ताव एकत्रितपणे पाठवणाररस्त्यांना १२५ कोटी देण्यासह मुख्यमंत्र्यांनी क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे व संशोधन केंद्रासाठी सात कोटी रुपये १५ दिवसांत देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रस्तावासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व इतर प्रस्ताव दिले जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

टॅग्स :highwayमहामार्गAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाChief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधी