जिल्हा रूग्णालयातील ‘सोनोग्राफी’ मशीन बंद
By Admin | Updated: October 31, 2014 00:34 IST2014-10-31T00:23:42+5:302014-10-31T00:34:41+5:30
उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीनही गत पंधरा दिवसांपासून बंद पडली आहे़ सोनोग्राफी मशीन बंद पडल्याने खासगी दवाखान्यात शेकडो रूपये खर्च करून

जिल्हा रूग्णालयातील ‘सोनोग्राफी’ मशीन बंद
उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रासलेल्या जिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीनही गत पंधरा दिवसांपासून बंद पडली आहे़ सोनोग्राफी मशीन बंद पडल्याने खासगी दवाखान्यात शेकडो रूपये खर्च करून खेटे मारावे लागत आहेत़
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, कर्मचाऱ्यांचा अभाव यासह इतर अनेक समस्यांनी जिल्हा रूग्णालयाला ग्रासले आहे़ जिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांसह इतर विविध आजाराचे रूग्ण दररोज उपचारासाठी येतात़ यातील बहुतांश रूग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो़ त्यातच गत काही दिवसांपासून येथील सोनोग्राफी मशीन बंद पडली आहे़ सोनोग्राफी मशीन बंद असल्याने तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांसह विविध योजनांतील लाभार्थ्यांना खासगी रूग्णालयात पैसे मोजून तपासणी करावी लागत आहे़ पोटाचे विविध विकाराने जखडलेल्या रूग्णांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे़ जवळपास निम्मा महिना लोटत आला तरी अद्यापही ही मशीन सुरू झालेली नाही़ मशीन बंद असल्याने जवळपास ४०० ते ८०० रूपयांपर्यंचा खर्च विविध तपासण्यांसाठी रूग्णांना करावा लागत आहे़ ३० ते ४० रूपयांमध्ये होणाऱ्या तपासणीसाठी शेकडो रूपये मोजावे लागत असल्याने संताप व्यक्त होत असून, संबंधितांनी याकडे लक्ष देवून सोनोग्राफी मशीन सुरू करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)