माजी सरपंचाच्या मुलास बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST2021-07-07T04:05:36+5:302021-07-07T04:05:36+5:30
वाळूज महानगर : दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरुन तिघांनी वळदगावच्या माजी सरपंचाच्या मुलास बदडल्याची घटना सोमवार (दि.५) सायंकाळी ...

माजी सरपंचाच्या मुलास बदडले
वाळूज महानगर : दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरुन तिघांनी वळदगावच्या माजी सरपंचाच्या मुलास बदडल्याची घटना सोमवार (दि.५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पंढरपुरात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वळदगावचे माजी सरपंच कैलास चुंगडे यांचा मुलगा गणेश चुंगडे यास गावातील नारायण डांगर हा सतत दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करुन त्रास देत होता. सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गणेश चुंगडे (२८ रा.वळदगाव) हा पंढरपूर ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर उभा असताना त्यास नारायण डांगर, हिरालाल डांगर व दिलीप डांगर या तिघांनी पकडून वाद घालण्यास सुरुवात केली. या वादावादीत नारायण डांगर याने हातात लोखंडी पाईप घेऊन तर हिरालाल याने काठी व दिलीप याने लोखंडी पट्टीने गणेश चुंगडे याच्यावर हल्ला करीत त्यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत गणेश याच्या उजव्या डोळ्याजवळ, पोटरीवर जखमा झाल्या असून मारहाणीनंतर तिघेही घटनास्थळावरुन पसार झाले. या मारहाण प्रकरणी नारायण डांगर, हिरालाल डांगर व दिलीप डांगर (सर्व रा.वळदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------