शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला; शरीरावर अनेक जखमा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:04 IST

प्राथमिक शवविच्छेदन अहवाल : घाटीत ३ तास चालले ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टम

छत्रपती संभाजीनगर : अनेक जखमांमुळे सोमनाथ सूर्यवंशी हे शाॅकमध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर आले. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शवविच्छेदनगृहात ३ तास ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टेम करण्यात आले.

घाटीत सकाळी ८ वाजता शवविच्छेदनाला सुरुवात झाली. ६ डाॅक्टरांच्या पथकाने ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन केले. नियमित शवविच्छेदनाला एक ते दीड तास लागतो. मात्र, हे शवविच्छेदन ३ तास चालले. सकाळी ११ वाजता शवविच्छेदन पूर्ण झाले. त्यानंतर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला.

काय आहे अहवालात? तज्ज्ञ काय म्हणाले?शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यूच्या तत्काळ कारणाच्या चौकटीत 'शॉक फॉलोइंग मल्टिपल इंज्युरी' असे नमूद करण्यात आले आहे. याचा नेमका काय अर्थ आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संपर्क साधला. तेव्हा अनेक जखमांमुळे रुग्ण ‘शाॅक’मध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

विश्लेषणासाठी व्हिसेरा राखीवरूटीन व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. रक्ताने भिजलेले कापूस, अवयवांचे तुकडे हिस्टोपॅथोलाॅजिकल तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम अभिप्राय (ओपिनिअन) दिला जाईल, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शवविच्छेदनापूर्वी सीटी स्कॅन का?शवविच्छेदनापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. एखाद्या मृतदेहाचे सीटी स्कॅन का केले जाते, याविषयी तज्ज्ञांना विचारले. तेव्हा शरीरावरील बारीक जखमाही सीटी स्कॅनमुळे दिसण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले.

लातूर की परभणी; पोलिसांनी पार्थिवाचे वाहन थांबवलेदरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी छत्रपतीसंभाजीनगर येथून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. अंबड चौफुली जवळ  अंत्यसंस्कार लातूर येथे करण्यास परवानगी आहे, असे म्हणत वाहने पोलिसांनी थांबली. मात्र, नातेवाइकांनी परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असे सांगत त्यावर ठाम राहिले. त्यामुळे पार्थिवदेह परभणीच्या दिशेने रवाना करण्यात आले. परभणी येथे अंत्यसंस्कारासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी, चळवळीतील नेते उपस्थित आहेत.

तरुणाच्या मृत्यूनंतर परभणीत तणावपूर्ण शांततापरभणी शहरात संविधान अवमान घटनेनंतर ११ डिसेंबर रोजी बंददरम्यान तोडफोड आणि नुकसानीच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याची कारागृहात रवानगी केली होती. रविवारी सकाळी त्याला जिल्हा रुग्णालयात आणले असता, त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ही माहिती समोर येताच शहरात रविवारपासून पुन्हा तणाव निर्माण झाल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला. बाजारपेठेत असो की, शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर प्रमुख वर्दळीच्या मार्गांवर सर्वत्र दुकाने बंद असल्याचे दिसून आले.

काय आहे प्रकरणपरभणीत १० डिसेंबर रोजी एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील शिल्प फोडले होते. त्याच्या निषेधार्थ ११ डिसेंबरला परभणी जिल्हा बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण मिळाले. बाजारपेठेतील बंद दुकानांसह त्यांच्या फलकांची तोडफोड झाली. अनेकांची वाहने जाळली, फोडली गेली होती. यात नासधूस करणाऱ्या अनेकांची पोलिसांनी धरपकड केली. गुन्हे नोंदवून त्यांना न्यायालयासमोर हजर केले. यातीलच एक आरोपी असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह. मु. शंकरनगर, परभणी) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. रविवारी त्याचा मृत्यू झाला. सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण समजताच आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले होते. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण होते. या मृत्यू प्रकरणात छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन पूर्ण व्हावे, यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेत निवेदन दिले. त्यानंतर दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे परभणीतून रवाना करण्यात आला.

टॅग्स :parabhaniपरभणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यूPoliceपोलिस