शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू; हायकोर्टाचा अंतरिम आदेश राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:12 IST

कुठल्या नियमाखाली कारवाई केली? : खंडपीठाचा शासनाला सवाल; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद

छत्रपती संभाजीनगर : परभणीतील संविधानाची प्रतिकृती भंग केल्यानंतर उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी अटक केलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणातील प्राथमिक मुद्द्यांवर अंतरिम आदेशासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. संजय देशमुख यांनी सोमवारी प्रकरण राखून ठेवले आहे.

सोमनाथच्या शवविच्छेदन अहवालावर दुसरे मत घेण्याचा निर्णय पोलिस अधीक्षकांनी कुठल्या नियमाखाली घेतला? सीआयडीकडे तपास कुठल्या नियमाखाली वर्ग केला? तसेच पोलिसांचा अहवाल का स्वीकारावा? असे तीन प्रश्न खंडपीठाने शासनाला विचारले. सोमनाथची आई विजया सूर्यवंशी यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी तर शासनाकडून मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी बाजू मांडली.

न्यायालयाने नियमावली करण्याची विनंतीॲड. आंबेडकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, न्यायालयीन कोठडीत एखाद्याचा मृत्यू झाल्यास बीएनएस (भारतीय न्याय संहिता) कायद्याच्या कलम १९६ नुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी (जेएमएफसी) त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची तरतूद आहे. मात्र त्यानंतरची पुढची पावले काय उचलावीत, याबाबत कायद्यात कुठलेही निर्देश नाहीत. राज्य शासनाने सुद्धा या संदर्भात कुठलेही स्पष्टीकरण केलेले नाही. न्यायालयीन कोठडीत ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो तो न्यायालयाच्या ताब्यात असतो म्हणून त्याला न्यायालयानेच ‘न्याय’ दिला पाहिजे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालावर पुढील कार्यवाही कशी व्हावी, यासंदर्भात विधानसभा तरतूद करेपर्यंत संविधानाच्या कलम २२७ खाली न्यायालयाने विचार करून नियमावली करावी, अशी विनंती केली. तसेच राज्य शासनाने सीआयडी अधिकाऱ्याची केलेली नियुक्ती रद्द करावी. मयत व्यक्ती न्यायालयाच्या ताब्यात होती म्हणून ‘एसआयटी’ सुद्धा न्यायालयानेच स्थापन करावी, अशी विनंतीही ॲड. आंबेडकर यांनी केली.

शासनाचे उत्तरशासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला आहे. १९० जणांना नोटीस बजावून जबाब नोंदवले आहेत. मात्र, सोमनाथच्या मृत्यू प्रकरणात तपासी अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल पुढील सुनावणीपर्यंत अंतिम करू नये, असे आदेश यापूर्वी खंडपीठाने २९ एप्रिल रोजी दिले आहेत. म्हणून चौकशी अहवालावर अंतिम निर्णय घेतला नाही, असे निवेदन केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर