कार्यशाळेतील काही शिक्षक गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:21 IST2017-07-22T00:20:29+5:302017-07-22T00:21:44+5:30

जिंतूर : तालुक्यातील अकोली येथे इयता पहिली ते आठवीच्या गणित, इंग्रजी, मराठी विषयासाठी आयोजित शिक्षकांच्या कार्यशाळेत शिक्षकच गायब होत

Some of the workshop workers disappeared | कार्यशाळेतील काही शिक्षक गायब

कार्यशाळेतील काही शिक्षक गायब

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : तालुक्यातील अकोली येथे इयता पहिली ते आठवीच्या गणित, इंग्रजी, मराठी विषयासाठी आयोजित शिक्षकांच्या कार्यशाळेत शिक्षकच गायब होत असल्याचा प्रकार सहाय्यक गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी शुक्रवारी दिलेल्या भेटीत समोर आला आहे. त्यामुळे कार्यशाळा नेमकी कशासाठी घेतली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विषयातील सखोल माहिती मिळावी, यासाठी शिक्षकांना विविध विषयाच्या कार्यशाळा घेण्यात येतात. तालुक्यातील अकोली येथील शासकीय निवासी शाळेत शुक्रवारी गणित, इंग्रजी, मराठी विषयासाठी कार्यशाळा आयोजित केली होती.
पाचलेगाव व जोगवाडा या दोन केंद्रातील २२ शाळांतील शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये १६ शिक्षिका तर ५२ शिक्षकांचा सहभाग होता. या विषयातील तज्ज्ञ शिक्षक विषयाची सखोल माहिती देत आहेत. मात्र शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत शिक्षकच गायब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी जिंतूर पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी या कार्यशाळेस अचानक भेट दिली. यावेळी कार्यशाळेतील सहभागी काही शिक्षक गप्पा मारत होते.
गटविकास अधिकारी ज्योती राठोड या कार्यशाळेमध्ये आल्याची माहिती मिळताच गायब झालेले शिक्षक मिळेल त्या वाहनाने धाव घेत होेते. कार्यशाळा सुरू झाल्यानंतर १३ ते १४ शिक्षक आले होेते. तोपर्यंत गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी कार्यशाळेची माहिती घेतली. यावेळी कार्यशाळेतील बहुतांश शिक्षकांना सोप्या प्रश्नांचेही उत्तर देता येत नव्हते.

Web Title: Some of the workshop workers disappeared