शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

काही रेल्वे रद्द, काहींचे मार्ग बदलले; ऐन गणेशोत्सवात रेल्वेचे ‘रडगाणे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 20:05 IST

ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद विभागातील पावसामुळे गत आठवडाभर रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यानंतर आता भुसावळ विभागातील लाइन ब्लाॅकमुळे काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर काही रेल्वे अंशत:, तर काही पूर्ण रद्द केल्या आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

निझामाबाद येथून ३ सप्टेंबर रोजी सुटणारी निझामाबाद - पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याबरोबरच रेक उपलब्ध नसल्यामुळे जालना - नगरसोल आणि नगरसोल - जालना (७७६२१ व ७७६२२), नगरसोल - नांदेड (०७२८२) रेल्वेदेखील बुधवारी रद्द करण्यात आल्या आहेत.

भुसावळ विभागातील लाइन ब्लाॅकमुळे निझामाबाद - पुणे एक्स्प्रेस ६ सप्टेंबर रोजी पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, कुरुडूवाडी, दौंडमार्गे धावणार आहे. रामेश्वर ओखा एक्स्प्रेस ५ सप्टेंबर रोजी पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, जळगाव, पलधीमार्गे धावेल. नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस ७ सप्टेंबर पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, खंडावामार्गे धावणार आहे, तर याच दिवशी मुंबईहून येणारी आणि जाणारी तपोवन एक्स्प्रेस पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड, कुरुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याणमार्गे ये-जा करेल.

जनशताब्दी धावणार नगरसोलपर्यंतचहिंगोली - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस ७ सप्टेंबर रोजी नगरसोलपर्यंतच धावणार आहे. ही रेल्वे नगरसोल ते मुंबईदरम्यान रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी धावणारी मराठवाडा एक्स्प्रेस ही धर्माबाद ते छत्रपती संभाजीनगर अशी धावेल. ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते मनमाडदरम्यान रद्द करण्यात आली आहे, तर ६ सप्टेंबर रोजी अजिंठा एक्स्प्रेस ही काचिगुडाहून नगरसोलपर्यंतच धावेल.

टॅग्स :railwayरेल्वेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर