उसाच्या ट्रकखाली सापडून जवान ठार
By Admin | Updated: December 4, 2014 00:52 IST2014-12-04T00:31:58+5:302014-12-04T00:52:34+5:30
सोनक पिंंपळगाव : अंबड तालुक्यातील कोळी सिरसगाव येथील रहिवाशी असलेले भारतीय सैन्य दलातील जवान तेजराव कुंडलिक तुपे (४३) यांचा ऊसाच्या ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाला.

उसाच्या ट्रकखाली सापडून जवान ठार
सोनक पिंंपळगाव : अंबड तालुक्यातील कोळी सिरसगाव येथील रहिवाशी असलेले भारतीय सैन्य दलातील जवान तेजराव कुंडलिक तुपे (४३) यांचा ऊसाच्या ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.४० वाजता घडली.
औरंगाबाद-बीड मार्गावर जालना व औरंगाबाद जिल्ह्याच्या शिवेवर ही घटना घडली. संभाजी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रकची (एम.एच. १७ सी. ७४२९) ठोस बसल्याने मोटारसायकलवरून (एम.एच.२१ व्ही. ९६१२) जाणाऱ्या तुपे यांचे नियंत्रण सुटले. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.
मुंबई येथील भारतीय सैन्य दलात ते कार्यरत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. सुटीवर आल्यामुळे आईसाठी पाचोडजवळील कोळी शिरसगाव येथे औषधी आणण्यासाठी गेले होते.
तुपे परत येत असतांना मुरमा गावाजवळ हा अपघात घडला. तेजराव तुपे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ व मोठा परिवार आहे. (वार्ताहर)