जमिनीच्या वादातून जवानास लाकडी दांड्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:27+5:302021-07-14T04:07:27+5:30
गोविंद पवार हे सैन्यात जवान असून सध्या सुट्टीवर घरी आलेले आहेत. त्यांच्यात व ज्ञानेश्वर खटाणे यांच्या कुटुंबियांमध्ये जमिनीचा जुना ...

जमिनीच्या वादातून जवानास लाकडी दांड्याने मारहाण
गोविंद पवार हे सैन्यात जवान असून सध्या सुट्टीवर घरी आलेले आहेत. त्यांच्यात व ज्ञानेश्वर खटाणे यांच्या कुटुंबियांमध्ये जमिनीचा जुना वाद आहे. या वादावर सध्या तहसील कार्यालयात तक्रार दाखल आहे. याच कारणावरून ज्ञानेश्वर खटाणे व त्याच्या कुटुंबियांनी पवार यांना तुम्ही आमच्याविरोधात तक्रार का दाखल केली, असे म्हणून लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. पवार यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गोविंद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर चंद्रकांत खटाणे, परसराम चंद्रकांत खटाणे, विशाल परसराम खटाणे, सिताराम त्रिभुवन खटाणे, सागर एकनाथ खटाणे, रमेश त्रिभुवन खटाणे, आकाश परसराम खटाणे, एकनाथ चंद्रकांत खटाणे, उद्धव एकनाथ खटाणे या नऊ जणांविरुद्ध विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार नवनाथ कदम करीत आहेत.