सैनिक हो तुमच्यासाठी; जवान गोपाल गांगुर्डे यांचे जन्मभूमीत जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 02:28 PM2021-02-26T14:28:49+5:302021-02-26T14:33:13+5:30

Indian Army ट्रेनिंग पूर्ण करून गावी परतलेल्या जवानाची नातलग व नागरिकांनी (सोशल डिस्टन्स पाळत) सत्कार करून मिरवणूक काढली.

Soldiers are for you; A warm welcome to the birthplace of Jawan Gopal Gangurde | सैनिक हो तुमच्यासाठी; जवान गोपाल गांगुर्डे यांचे जन्मभूमीत जंगी स्वागत

सैनिक हो तुमच्यासाठी; जवान गोपाल गांगुर्डे यांचे जन्मभूमीत जंगी स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्देसोयगाव येथील गोपाल श्रावण गांगुर्डे असं जवानाचं नाव आहे.दीड वर्षांपूर्वी भारतीय लष्करात झाली निवड

सोयगाव : रुबाबात बुलेटवर स्वार झालेला लष्करातील जवान.. दिमतीला बँड बाजा आणि त्याचबरोबर फुलांचे हार घेऊन उभे राहिलेलं गाव...याचे कारणही तसं खास होतं..गावातील एका भूमिपूत्र देशाची सेवा करण्याचे ध्येय बाळगून अहोरात्र मेहनत करून लष्करात कर्तव्य बजावण्याचे ध्येय पूर्ण केले. ट्रेनिंग पूर्ण करून गावी परतलेल्या जवानाची नातलग व नागरिकांनी (सोशल डिस्टन्स पाळत) सत्कार करून मिरवणूक काढली.

सोयगाव येथील गोपाल श्रावण गांगुर्डे असं जवानाचं नाव आहे. दीड वर्षांपूर्वी गोपाल गांगुर्डे यांची भारतीय लष्करात आसाम रायफल्समध्ये हवालदार (क्लार्क) पदी निवड झाली होती. सध्या ते मणिपूर येथे कर्तव्य बजावत आहेत. प्रशिक्षण पूर्ण करून सुट्टीनिमित्त गावात आल्यानंतर आई व नातलग महिलांनी औक्षण केले. गावकरी व मित्र मंडळाने गोपालयाचे जंगी स्वागत करत, संगीताच्या ठेक्यावर ताल धरत स्वागत केले. हे सर्व पाहून जवान गोपाल गांगुर्डे भारावून गेले होते. गावकऱ्यांचे प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

यावेळी हर्षल काळे, प्रमोद परदेशी, श्रीराम काळे, जयराम परदेशीं, दीपक कोरडे, देवेंद्र जावळे, दीपक बनकर, सलमान शिकलगर, समाधान काळे, अक्षय हिवराळे, शंभो मंडवे, गणेश साळुंके, ईश्वर परदेशी, रामेश्वर चौधरी, सागर चौधरी, अजय नेरपगारे, तौफिक पठाण, कलीम पठाण, अंकुश पगारे, विवेक जोशी, अक्षय ठाकूर, दिनेश काळे, शुभम श्रीखंडे, मंगेश साळवे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

Web Title: Soldiers are for you; A warm welcome to the birthplace of Jawan Gopal Gangurde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.