वाळूजवाडीत सौरदिव्यांचा लखलखाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:25 IST2019-04-11T23:25:05+5:302019-04-11T23:25:15+5:30
वाळूज ग्रामपंचायतीच्यावतीने वाळूजवाडीत सौर दिवे उभारले असून, या दिव्यांच्या लखलखाटामुळे रस्ते उजळून निघाले आहेत.

वाळूजवाडीत सौरदिव्यांचा लखलखाट
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्यावतीने वाळूजवाडीत सौर दिवे उभारले असून, या दिव्यांच्या लखलखाटामुळे रस्ते उजळून निघाले आहेत.
वाळूजवाडीतील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वसाहतीला भेट देऊन सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार या वसाहतीत ग्रामपंचायतीकडून १५ सौर दिवे बसविले आहेत. या दिव्यांच्या लखलखाटामुळे रस्ते उजळून निघाले आहेत. या भागातील इतर प्रलंबीत प्रश्नही निकाली काढण्याची मागणी गोवर्धन बम्हनावत, दिलीप घुनावत, भरत घुणावत, धनसिंग घुनावत आदी नागरिकांनी केली आहे.