सौरदिव्यांचा प्रश्न लटकलेलाच
By Admin | Updated: January 14, 2016 23:13 IST2016-01-14T23:10:01+5:302016-01-14T23:13:51+5:30
हिंगोली : ई-निविदा झाल्यानंतरही जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सौरदिव्यांच्या योजनेला पालकमंत्र्यांच्या नावाखाली आलेल्या संदेशानंतर ‘खो’ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सौरदिव्यांचा प्रश्न लटकलेलाच
हिंगोली : ई-निविदा झाल्यानंतरही जि.प.च्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सौरदिव्यांच्या योजनेला पालकमंत्र्यांच्या नावाखाली आलेल्या संदेशानंतर ‘खो’ बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र दुसरीकडे पदाधिकारी आक्रमक झाले असून झालेल्या प्रक्रियेनंतर प्रशासनाने या बाबींना महत्त्वच देवू नये, असे सांगितले जात आहे.
एक कोटी रुपयांच्या निधीतून लोकवाटा भरल्यानंतर मागेल त्या गावास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या निकषानुसार सौरदिवे देण्यात येणार आहेत. गतवर्षी सुरू झालेले या योजनेच्या निविदेचे काम या वर्षात पूर्ण झाले. मात्र तरीही प्रत्यक्षात ते अंतिम होण्यात अडचणींचा सामना करणे क्रमप्राप्त ठरत आहे. आता ही प्रक्रिया मध्येच थांबण्यासाठी पालकमंत्र्यांच्या नावाखाली आलेला तोंडी संदेश कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जात आहे. असाच प्रकार राहिला तर जि. प. तील कामेच होणे अवघड होणार आहे. त्यामुळे पदाधिकारीही आक्रमक झाले असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)