शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'सोलार ड्रायर'ने दिला खंबीर रोजगार; ग्रामीण भागातील ४५ महिला झाल्या घरातील 'कर्त्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 18:46 IST

मागील तीन वर्षापासून या महिलांनी घराचा सर्व खर्च उचलत कुटुंबाला कायमच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढले

फुलंब्री : तालुक्यातील मारसावळी गावातील महिलांनी सौर वाळवणी ( सोलार ड्रायर) यंत्राच्या माध्यमातून रोजगाराचा आधार शोधला आहे. या माध्यमातून ४५ महिला स्वबळावर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. मागील तीन वर्षापासून या महिलांनी घराचा सर्व खर्च उचलत कुटुंबाला कायमच्या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यास हातभार लावला आहे. kadhle

फुलंब्री पासून राजूर मार्गावर पिरबावडा पासून डोगरावरती वसलेले मारसावळी गाव. तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात मुख्यतः शेती व्यवसाय येथे ७० टक्के जमीन जिरायत तर केवळ ३० टक्केच जमीन बागायती आहेत. मागील काही वर्षापासून येथील काही कुटुंब ऊसतोडणीला जात होते. स्थानिक महिला मजुरी करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जात. मात्र आता रोजगारासाठी गाव सोडाव्या लागणाऱ्या कुटुंबांना 'सोलार ड्रायर'च्या माध्यमातून घरबसल्या रोजगार उपलब्ध झाला आहे. यातून गावातील तब्बल ४५ महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. 

सायन्स फोर सोसायटी या संस्थेने २०१९ मध्ये मारसावळी येथे येऊन पाहणी केली. महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता त्यांनी प्रयत्न सुरू केले. पहिल्यांदा गावातील पाच महिलांच्या हातात सोलार ड्रायरचे छोटेखानी काम उपलब्ध करून दिले. आता ४५ महिला यात सहभागी आहेत. त्या प्रत्येक महिलाच्या घरी कंपनीने सोलार ड्रायर, एफबिडी फॉन मशीन, भाजीपाला कापणारी मशीन उपलब्ध करून दिली आहे. या महिला दररोज सकाळी घरकाम आटोपल्यानंतर दोन ते तीन तास कांदा, लसूण,अद्रक, टोमॅटो या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्याला सुकवून कट्टे तयार करतात. तयार झालेला सुका माल कंपनी गावात घेऊन घेऊन जाते व पैसे देते. एक क्विंटल सुका भाजीपाला देऊन एका दिवसाला साडेबारा हजार रुपये महिलांना मिळतात. तर महिन्याला साडेतीन लाख रुपये या माध्यमातून गावात येतात.

कर्ज फिटले, मुलांचे शिक्षण झाले सायन्स फॉर सोसायटी च्या माध्यमातून २०१९ मध्ये भाजीपाला प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अडचणी आल्या पण आजघडीला काम योग्यरीत्या सुरु आहे. यातून मिळालेल्या पैशांतून कर्ज फेडता आले. तसेच मुलाच्या शिक्षणाला हातभार लावता आला. घरखर्चही भागत आहे. - कविता चंद्रकांत गाडेकर

कुटुंबाला आर्थिक सक्षम केलेपाऊस नसेल तर शेतीत काही मिळत नाही. तीन वर्षापूर्वी मजुरी करण्यासाठी जात होते. पण आता घरबसल्या हाताला काम मिळाले. महिन्याला पैसे मिळत असल्याने कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करता आले. - रेखा अशोक दुधे 

टॅग्स :WomenमहिलाAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र