प्रत्येक तालुक्यात मातीपरीक्षण केंद्र
By Admin | Updated: September 7, 2014 00:23 IST2014-09-06T23:49:52+5:302014-09-07T00:23:05+5:30
भोकरदन : देशात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरीक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी रविवारी भोकरदन येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक तालुक्यात मातीपरीक्षण केंद्र
भोकरदन : देशात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरीक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी रविवारी भोकरदन येथे पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री सिंह पुढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांंचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक शेतीसाठी पाणी व ते निर्माण करण्यासाठीची योजना तयार करण्यात येत आहे.
आधुनिक पद्धतीने शेतीसाठी येत्या तीन वर्षात देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मातीपरिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत राज्य सरकरने केंद्राकडे कोणताही प्रस्ताव पाठविला नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात सांगून राज्य सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप सिंह यांनी केला. या राज्यात पशुधन कमी झाले याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आ.बबनराव लोणीकर, संतोष पाटील दानवे, राजेद्र फडके,ज्ञानोबा मुंढे हे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)