शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्ता, पोलिसांनीच सुरू केला पत्त्यांचा क्लब; छत्रपती संभाजीनगरातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:01 IST

विविध लोकांच्या नावे ७ क्युआर कोडवर व्यवहार, सामाजिक कार्यकर्त्यांसह पाेलिस ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा भाजीमंडईतील एका इमारतीत सामाजिक क्रीडा मंडळ, सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी धाड टाकून २४ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या क्लबमधून जवळपास एक लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सामाजिक कार्यकर्ता आणि पोलिसांनी मिळून हा क्लब सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

औरंगपुरा परिसरात रणजितसिंग चव्हाण हा क्लब चालवत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. मंगळवारी दुपारी चार वाजता बागवडे यांनी पथकासह क्लबवर छापा मारला. तेव्हा तेथे पाच टेबलवर जुगाऱ्यांचा डाव रंगलेला होता. जुगाऱ्यांसाठी कूलर, पाण्याच्या जारची व्यवस्था करण्यात आली होती. यात प्रामुख्याने विविध विषयांवर आंदोलन करणारे, नेत्यांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणारा रमेश पाटील, पोलिस कर्मचारी सुरेश इंगळे, कान्होबा भोने, शुभम पंढुरे, मोईन अहमद अजीज अहमद, किरण भाटी, उदय भाटी, अक्षय चावरीया यांच्यासह २३ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

क्युआर कोडवर पैसेघटनास्थळी रोख रक्कम केवळ १७ हजार रुपयेच मिळून आली. मात्र, ७ क्युआर कोड आढळले. सातही क्युआर कोड विविध व्यक्तींच्या नावे आहेत. त्यावरच ऑनलाइन पैसे घेऊन कॉईनवर जुगार खेळवला जात होता. यात पकडला गेलेला शेख हबीब शेख रहमान (वय ५५, रा. कटकट गेट) हा चव्हाण, पाटील व इंगळे यांच्या सांगण्यावरून २०० रुपये रोजाने साफसफाईचे काम करीत होता, अशी कबुली त्याने दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsocial workerसमाजसेवक