कर भरणे हे नागरिकांचे सामाजिक दायित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:54 IST2017-08-06T00:54:52+5:302017-08-06T00:54:52+5:30
कर चुकविण्याची मानसिकता बदलून नागरिकांनी स्वत:हून कर भरावा, असे आवाहन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.

कर भरणे हे नागरिकांचे सामाजिक दायित्व
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशाची सुरक्षा, सुविधा, विकासकामे करायची असतील तर सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होणे आवश्यक आहे. यामुळे कर भरणे प्रत्येक नागरिकांचे सामाजिक दायित्व आहे. याकरिता कर चुकविण्याची मानसिकता बदलून नागरिकांनी स्वत:हून कर भरावा, असे आवाहन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.
आयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थित चार्टर्ड अकाऊंटंटला समाजात कर भरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी आवाहन केले.
सातारा परिसरातील आयसीएआय भवन आयोजित परिषदेत डायरेक्ट टॅक्स कमिटीचे उपाध्यक्ष सीए एन. सी. हेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर श्रीवास्तव यांनी सांगितले की, मार्च ते सप्टेंबर २०१६ दरम्यान औरंगाबाद विभागात ५०० कोटींची अघोषित संपत्ती जाहीर झाली आहे.
मागील आर्थिक वर्षात विभागाने ११०० कोटींचे करसंकलन के ले आहे. ३ लाख ५५ हजार करदाते असून, मागील वर्षात यात नवीन दीड लाख करदात्यांचा समावेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी स्वागतपर भाषण सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका व सीए उमेश शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन प्रणव राठी, गौरी पंडित यांनी तर पंकज सोनी यांनी आभार मानले. परिषदेचा रविवारी शेवटचा दिवस असून, यात अॅड. कपिल गोयल, सीए चंद्रशेखर चितळे, सीए एम. आर. हुंडीवाला, सीए चैतन्य के. के., सीए जगदीश पंजाबी मार्गदर्शन करतील.