नाटकांमधून दिला सामाजिक संदेश

By Admin | Updated: April 18, 2016 00:55 IST2016-04-18T00:55:49+5:302016-04-18T00:55:49+5:30

औरंगाबाद : महावीर जयंतीनिमित्त सध्या शहरातील जैन समाजबांधवांकडून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत.

Social messages from plays | नाटकांमधून दिला सामाजिक संदेश

नाटकांमधून दिला सामाजिक संदेश

औरंगाबाद : महावीर जयंतीनिमित्त सध्या शहरातील जैन समाजबांधवांकडून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. भगवान महावीर जन्मकल्याणक समिती-२०१६ द्वारे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रविवारी महिलांसाठी नाटक स्पर्धा घेण्यात आल्या. या नाटकांद्वारे महिलांनी सामाजिक प्रश्न हाताळून त्यावर प्रभावी भाष्य केले.
नीलिमा ठोळे यांच्या ‘स्त्रीभ्रूणहत्या’विषयक एकपात्री प्रयोगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निकिता साहुजी यांनी रंगवलेली प्रखर आणि तेजस्वी ‘झांशीची राणी’ प्रेक्षकांना विशेष आवडून गेली. मैत्री बहुमंडळाने सादर केलेल्या नाटिकातून प्रेक्षकांना परिसर आणि पर्यायाने संपूर्ण देशच स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा, वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, भारती बागरेचा, मुकेश साहुजी, मिठालाल क ांकरिया, अनिलकुमार संचेती, विकास रायमाने, संतोष पापडीवाल, राजेश मुथा, नीलेश सावलकर, संजय सुराणा, नीलेश पहाडे, सुनील वायकोस, करुणा साहुजी, आदींची उपस्थिती होती.
महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रमाला प्रतिसाद
औरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीअंतर्गत महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रश्नावली स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे व धार्मिक संस्कार शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळातर्फे सराफा बाजार येथील जैन मंदिरात प्रश्नावली स्पर्धा घेण्यात आली. यात १७० महिलांनी सहभाग घेतला. यात धार्मिक, दिमाख की बत्ती जलाओ, पहेलिया, महापुरुषांच्या मातांची नावे, चिन्हावरून तीर्थंकारांची नावे लिहिणे आदींचा समावेश होता. स्पर्धेसाठी नंदा साहुजी, रिता साहुजी, सुषमा साहुजी, वर्षा साहुजी, सुनीता साहुजी, नंदा साहुजी, सारिका साहुजी, सुनंदा साहुजी, ज्योती साहुजी, अर्चना साहुजी, पद्मा साहुजी, उषा साहुजी, स्वाती साहुजी, प्रिया साहुजी, चित्रा साहुजी, पूजा साहुजी आदींनी परिश्रम घेतले.
कल्पकतेचा कलाविष्कार
अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळातर्फे आयोजित स्पर्धेत महिला व तरुणींनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करून कल्पकतेचा कलाविष्कार दाखविला. यात दृष्टी बदलल्यास सृष्टी बदलता येते याप्रमाणे निरुपयोगी वस्तूंपासून सुबक, आकर्षक, विविध आकार, रंगसंगती यापासून कागद, बिया, बाटल्या, पेन, ग्लास, सी. डी. पेपर, टी-शर्ट, बांगड्या, नारळ आदींपासून तबला, पाळणा, आकाशकंदिल, टेबल लॅम्प, विद्युत माळ, फ्रेम, आकर्षक दिवा आदी वस्तू स्पर्धकांनी बनविल्या. परीक्षक म्हणून डॉ. निर्मला मुथा, पल्लवी शहा, पूजा साहुजी यांनी काम पाहिले. यावेळी महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या व कमला ओस्तवाल, मंजू पाटणी, मीना पापडीवाल, शारदा लोहाडे आदींची उपस्थिती होती.
धार्मिक संस्कार शिबीर
औरंगाबाद : भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त अहिंसानगर येथे धार्मिक संस्कार शिबीर घेण्यात आले. यात ७० जणांनी सहभाग घेतला.
लहान मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षणसुद्धा मिळावे या हेतूने अहिंसानगर बहुमंडळाच्या वतीने ११ ते १५ एप्रिलदरम्यान शिबीर घेण्यात आले. यात ३ ते १८ वयोगटातील मुला-मुली सहभागी झाल्या होत्या. शिबिराच्या सांगताप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा, मिठालाल कांकरिया, विमलराणी बाफना, राखी देसरडा, भगवानदास शिसोदिया, बहुमंडळाच्या अध्यक्षा रुपाली चोरडिया यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी जैन धर्माची माहिती असलेल्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी सुषमा शिसोदिया, तृप्ती बोरुदिया, रुपाली जैन, कविता जैन, रश्मी मुथा, मोना गांधी आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Social messages from plays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.