आतापर्यंत फक्त ३५.७९ टक्के पाऊस
By Admin | Updated: September 1, 2014 01:06 IST2014-09-01T00:33:57+5:302014-09-01T01:06:29+5:30
जालना: जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. दोन महिने दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा आगमन झाल्याने पावसाच्या नोंदीत वाढ झाली आहे

आतापर्यंत फक्त ३५.७९ टक्के पाऊस
जालना: जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. दोन महिने दडी मारलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून पुन्हा आगमन झाल्याने पावसाच्या नोंदीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४६. ३८ मि. मी. म्हणजेच ३५.३८ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस असल्याने दुष्काळी स्थिती जैसे थेच आहे.
जिल्ह्यात शनिवारी जाफराबाद आणि बदनापूर तालुका वगळता सर्वत्र पाऊस झाला. त्याची एकूण सरासरी १०.२७ मि. मी. ऐवढी आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी कंसातील आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची नोंद आहे. जालना ७.५० (२६६.७९), भोकरदन १.८८(३४९.३५), जाफराबाद ००(२४७.४), बदनापूर ०० (२२२.८), परतूर २८.२० (२३२.२९), अंबड १७.०० (२३२.२९), घनसावंगी १९.८६ (१८४.६८) , मंठा ६.७५ (१५८.७५ )मि. मी. असा एकूण सरासरी २४६.३८ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्याची वार्षिक सरासरी फक्त ३५ .७९ टक्के आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात अधिक पाऊस भोकरदन तालुक्यात ३४९. ३५ मि. मी. झाला तर सर्वात कमी पाऊस मंठा तालुक्यात १५८.७५ मि. मी झाला आहे.
अद्यापही जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ५० टक्याच्या आतच आहे. त्यामुळे टंचाई स्थिती कायम आहे. मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाामुळे पावसाची टक्केवारी वाढत आहे. १५ दिवसापूर्वीच केवळ १७ टक्के असलेल्या पावसाची आकडेवारी आता ३५ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. वरुणराजाने उशिरा का होईना पण हजेरी लावल्याने या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. मध्यंतरी थोडा पाऊस झाल्यानंतर पुन्हा सुमारे दीड महिना पाऊस गायब झाला होता. २० आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात फक्त १७ टक्के पाऊस पडलेला होता. त्यानंतर पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने दहा दिवसांत या टक्केवारीत वाढ झाली. ती आता ३० आॅगस्टपर्यंत ३५ टक्के झाली आहे.