शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात स्क्रॅपच्या आडून सव्वाकोटी रुपयांच्या ‘एमडी’ ड्रगची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:52 IST

या प्रकरणी कंपनी मालकासह दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर : साजापूर गावाच्या चौफुलीवर अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाकडून (एनडीपीएस) दोन ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेले १ कोटी २३ लाख ६५ हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन पावडर) जप्त करण्यात आले होते. या जप्त पावडरची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर तीन आरोपींविरोधात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती एमडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

आरोपींमध्ये ट्रक चालक सफीकुर रहेमान तफज्जुल हुसेन (रा. तिरथ, उत्तर प्रदेश), राज रामतिरथ अजुरे (रा.तिरथ) आणि स्क्रॅपचा मालक बबन खान (रा. साजापूर) यांचा समावेश आहे. एनडीपीएसच्या पाेलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक पाेलिस निरीक्षक मनाेज शिंदे, उपनिरीक्षक अमाेल म्हस्के यांच्या पथकाने साजापूर चाैफुली परिसरात शनिवारी आयशर ट्रक एमएच ०४ बीयु ५१६० आणि एमएच ०४ ईवाय ९९७७ थांबवून जप्त केले हाेते. या वाहनांमध्ये स्क्रॅपच्या मालामध्ये पांढरे पावडरसदृश रसायन व द्रव असलेले रसायन हाेते. त्याच वेळी सोमवारी पथकास मिळालेल्या माहितीनुसार साजापूर परिसरातील गाेडाऊन येथे छापा मारल्यानंतर त्यामध्येही स्क्रॅप मालामध्ये पांढरे पावडरसदृश रसायन सापडले. या रसायनाची शासकीय ड्रग चाचणी कीटद्वारे तपासणी केल्यानंतर त्यात एमडी तथा मेफेड्राॅनसदृश अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. 

दिडकोटींचा मुद्देमाल जप्तया कारवाईत एकूण २ किलाे ४७३ ग्रॅम वजनाची एमडी किंवा मेफेड्राॅन पावडर, दाेन आयशर ट्रक, असा एकूण १ काेटी ४३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पाेनि. बागवडे, सपाेनि मनाेज शिंदे, उपनिरीक्षक म्हस्के, हवालदार लालाखान पठाण, अमलदार संदीप धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे, शिल्पा तेलाेरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDrugsअमली पदार्थ