स्मृती इराणींना चोळी-बांगडी, तर पंतप्रधान मोदींना टॉवेल-टोपीचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:02 IST2021-03-19T04:02:02+5:302021-03-19T04:02:02+5:30

औरंगाबाद : भाजप सरकारचा निषेध आणि महागाईचा विरोध म्हणून युवक काँग्रेसतर्फे स्मृती इराणी यांना चोळी-बांगडीचा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Smriti Irani wears a choli-bangle, while Prime Minister Modi wears a towel-hat | स्मृती इराणींना चोळी-बांगडी, तर पंतप्रधान मोदींना टॉवेल-टोपीचा आहेर

स्मृती इराणींना चोळी-बांगडी, तर पंतप्रधान मोदींना टॉवेल-टोपीचा आहेर

औरंगाबाद : भाजप सरकारचा निषेध आणि महागाईचा विरोध म्हणून युवक काँग्रेसतर्फे स्मृती इराणी यांना चोळी-बांगडीचा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॉवेल-टोपीचा आहेर करण्यात आला.

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळात पेट्रोल, गॅस, अन्नधान्य, खाद्यतेल यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. तरीही स्मृती इराणी व इतर भाजप नेते याविषयी मौन बाळगून आहेत.

याउलट २०१२- १३ यावर्षी तत्कालिन काँग्रेस सरकारविरोधात महागाईच्या मुद्द्यावर स्मृती इराणी व इतर भाजप नेत्यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या. म्हणूनच आता भाजप सरकारचा निषेध म्हणून युवक काँग्रेसतर्फे स्मृती इराणी यांना चोळी-बांगडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॉवेल-टोपी ‘रिटर्न गिफ्ट’ स्वरूपात देऊन आहेर करण्यात आला. दोन्ही नेत्यांना हा आहेर पोस्टाने पाठविण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते डॉ. नीलेश अंबेवाडीकर, गुरमितसिंग गिल, विजय कांबळे, आकाश रगडे, मयूर साठे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ :

भाजप नेत्या स्मृती इराणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहेर स्वरूपातील रिटर्न गिफ्ट युवक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पाठवले.

Web Title: Smriti Irani wears a choli-bangle, while Prime Minister Modi wears a towel-hat