स्मार्टवर्कचा ‘विक्रम’

By Admin | Updated: May 19, 2015 00:52 IST2015-05-19T00:33:53+5:302015-05-19T00:52:49+5:30

दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी,

Smartwork's 'Vikrama' | स्मार्टवर्कचा ‘विक्रम’

स्मार्टवर्कचा ‘विक्रम’


दोन वर्षांपासूनचा दुष्काळ, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, डीएमआयसीच्या भूसंपादन प्रक्रियेतून वेळ काढीत पर्यटन, जिल्ह्यातील कर्मचारी, स्वस्त धान्य दुकान आणि सिमेंट बंधाऱ्यांच्या कामासाठी स्मार्ट फोनच्या मदतीने वेगवेगळे उपयुक्त अ‍ॅप्स विकसित करीत घृष्णेश्वर मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासह सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवून स्मार्ट वर्कचा ‘विक्रम’ मावळते जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केला.

विकास राऊत ल्ल औरंगाबाद
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) मुंबई येथील कार्यालयात सहसंचालक म्हणून विक्रमकुमार यांची नियुक्ती झाली आहे. या प्रकल्पासाठी ते पद निर्माण करण्यात आले असून, विक्रमकुमार यांची पहिली नियुक्ती त्या पदावर झाली आहे. जरी मुंबईत असलो तरी शहरात डीएमआयसीच्या निमित्ताने येणे-जाणे असेलच. शहरासाठी काम करण्याची इच्छा कायम असल्याचे मत विक्रमकुमार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. दोन वर्षे चार महिन्यांचा कार्यकाळ विक्रमकुमार यांना मिळाला. या काळात केलेल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकला.
अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट स्मार्ट फोनच्या साह्याने केले. स्वस्त धान्य दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण व डॉक्टरांसाठी स्मार्टवरून अ‍ॅप्लिकेशन तयार केले. तलाठ्यांच्या हजेरीसाठी, सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाच्या आढावादेखील स्मार्ट फोनवरून घेण्याची सुविधा विकसित केली.
पर्यटन
वेरूळ-अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटक येतात. गाईड अ‍ॅप्स त्यासाठी तयार केले. हेडफोन लावून त्या अ‍ॅपद्वारे इंग्रजी, हिंदी, मराठी, जपानी भाषेतून लेण्यांची माहिती पर्यटकाला मिळेल. ४ ते ५ दिवसांत हे अ‍ॅप्लिकेशन सुरू होणार आहे. लेणी समोर येताच फोनवरील अ‍ॅप सुरू करताच पर्यटकांना माहिती मिळेल. म्हैसमाळ विकासासाठी कॅम्पेन रिसोर्ट टेंट तयार केले. निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव पर्यटकांना मिळण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. मेअखेरपर्यंत या उपक्रमाचे काम पूर्ण होईल. डीपीडीसीच्या निधीतून दोन बसेस वेरूळ व अजिंठा लेणी दर्शनासाठी तयार केल्या जात आहेत. एस. टी. आणि पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढच्या महिन्यापासून त्या बसेस पर्यटकांच्या सेवेत येतील.
महसूल
जिल्ह्याच्या महसुलाचे लक्ष्य पूर्ण करता आले. ३,२९० कोटी रुपयांचा आकडा पार केला. ३२०० कोटींचा महसूल एक्साईजमधून मिळाला. सुवर्णजयंती राजस्व अभियान हाती घेतले. दाखले देण्याचे काम सुरू केले. जिल्हानिहाय कॅम्प घेतले. विविध खात्यांतर्गत उपक्रम घेतले. शिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप अनुदानाचे वाटप नियोजन करून केले.
डीएमआयसी
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ४ हजारांपैकी ३२०० हेक्टर भूसंपादन झाले आहे. ८०० हेक्टर बाकी आहे. भूसंपादन ही क्लिष्ट प्रक्रिया असूनही शांततेत पार पडली. तहसीलदार, तलाठ्यांचे परिश्रम त्यामागे आहेत. भूसंपादनासाठी २३ लाख रुपये एकरी रक्कम मोबदल्यासाठी दिली. दुष्काळ, लोकसभा, विधानसभा निवडणुका असतानाही ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, याचा आनंद आहे. शिवाय सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामेदेखील पाडली. अडीच वर्षांत मला व विभागाला कामातून उसंत मिळाली नाही.
शहरात येणे होणारच
डीएमआयसीच्या निमित्ताने आता शहरात येणे होणारच आहे. सहसंचालक हे पद पहिल्यांदाच निर्माण करण्यात आले असून, त्या पदाच्या कामकाजाची भूमिका अजून समजलेली नाही. माझ्याकडे नेमकी काय जबाबदारी आहे हे पदभार घेतल्यानंतरच समजेल, असेही विक्रमकुमार म्हणाले.

Web Title: Smartwork's 'Vikrama'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.