‘एआय’ टूल्सचा स्मार्ट वापर; ६३ हजार २०७ मतदारांची डबल नावे शोधली

By विकास राऊत | Published: January 25, 2024 02:02 PM2024-01-25T14:02:27+5:302024-01-25T14:03:59+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ लाख ९३ हजार मतदार मतदानासाठी पात्र

Smart use of 'AI' tools; Double names of 63 thousand 207 voters were found | ‘एआय’ टूल्सचा स्मार्ट वापर; ६३ हजार २०७ मतदारांची डबल नावे शोधली

‘एआय’ टूल्सचा स्मार्ट वापर; ६३ हजार २०७ मतदारांची डबल नावे शोधली

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या २९ लाख ९३ हजार ४०३ वर गेली आहे. यामध्ये १ लाख २० हजार ६६० नवीन मतदारांची नोंदणी झाली. यादीतील ६३ हजार २०७ मतदारांचे फोटो, दोन वेळा असलेली नावे वगळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा प्रथमच वापर करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

२३ जानेवारी २०२४ पर्यंतच्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार १५ लाख ७० हजार ७३९, स्त्री मतदार १४ लाख २२ हजार ५३१ व तृतीयपंथी मतदार १३३ अशी एकूण मतदारसंख्या २९ लाख ९३ हजार ४०३ इतकी आहे. १ लाख २० हजार ६६० इतकी नवीन मतदार नोंदणी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार पश्चिम मतदारसंघात आहेत.

१ लाख २० हजार ६६० नवमतदार....१८ ते १९ या वयोगटातील मतदारांची अंतिम यादीत ३४ हजार १०९ इतकी संख्या झाली आहे. २० ते २९ या वयोगटाची मतदार संख्या ६ लाख ४ हजार ८५८ इतकी आहे. १ लाख २० हजार ६६० नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात २८९८ मतदान केंद्रे असतील. यात अतिरिक्त ८६ केंद्रे साहाय्यकारी असतील.

११ हजार मतदारांनी सोडला जिल्हा...
११ हजार ९५ मतदारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोडला आहे. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यातील मतदार यादीत नावे नोंदविली असावीत. १ हजार पुरुषांमागे ९०६ महिला मतदारांची संख्या आहे.

कोणत्या मतदारसंघात किती मतदार?
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रातील २० लाख ७ हजार ३०५ मतदार असतील. तर जालना लोकसभा मतदारसंघात ९ लाख ८६ हजार ९८ मतदार असतील.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या
विधानसभा मतदार संघ ..... पुरुष मतदार..... स्त्री मतदार संख्या .... इतर ...... एकूण मतदार
छत्रपती संभाजीनगर मध्य ....१७४६२९....... १६४४१२ ...........४ ................ ३३९०४५
छत्रपती संभाजीनगर पश्चिम ....१९७५४५ ...... १७६८६५....... ७५ ............... ३७४४८५
छत्रपती संभाजीनगर पूर्व ..........१७१०७४ ...... १५५८१६ ..... १० ................ ३२६९००
कन्नड                         ................. १६९३७५ .................... १५२३७३ ............ ८........... ३२१७५६
गंगापूर                         ...............१७७७५०....................... १६०१८८             .............. २१ ............. ३३७९५९            
वैजापूर                         ................. १६०८८९ ...................... १४६२६८...........३................... ३०७१६०            
सिल्लोड ....................... १७६२५६................ १५७८१४...... ३................. ३३४०७३
फुलंब्री ............... १८०८७६ ................. १६२४४६ ............... ५ ........... ३४३३२७
पैठण ................... १६२३४५ .................. १४६३४९ ............. ४ .............. ३०८६९८
एकूण................... १५७०७३९ .................... १४२२५३१             ............ १३३ ........... २९९३४०३

Web Title: Smart use of 'AI' tools; Double names of 63 thousand 207 voters were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.